ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-कार्यसम्राट मा.सरपंच श्री.नंदकुमार मामा गावडे यांचा वाढदिवस विविध सेवा सुविधा व योजनांनी साजरा.

पत्रकार प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार प्रतिनिधी आशितोष चव्हाण

 फलटण:-गोखळी–
वाढदिवसाचे कार्यक्रम करण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणात रूढ होते आहे त्यातही डीजे, हुल्लडबाजी ,डान्स याची तर फॅशन सुरू आहे परंतु गोखळी गावचे कार्यसम्राट माजी सरपंच नंदकुमार गावडे मामा यांच्या वाढदिवसानिमित्त मानवी आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीर, मोफत औषधे वाटप, रक्तदान शिबीर तसेच शिधापत्रिका दुरुस्ती शिबीर अशा विविध उपक्रमांचेआयोजन केल्याने फलटण तालुक्याच्या पूर्व भागात समाज माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. **कार्यसम्राट माजी सरपंच नंदकुमार गावडे मामा यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल १४३जणांनी रक्तदान करून आतापर्यंत झालेल्या सर्व शिबिरातील उच्चांक मोडला आहे.* हा उपक्रम कार्यसम्राट माजी सरपंच नंदकुमार गावडे युवा मंच, निदान हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल आटोळे गोखळी,ओम ब्लड बँक मंगळवार पेठ पुणे, आणि संजीवनी ब्लड बँक भोसरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला वाढदिवसानिमित्त अस्थिरोग हृदयरोग तपासणी व मोफत औषध वाटप, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला या उपक्रमाला फलटण पूर्व भागातून उत्तम प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद पाहून पुणे येथील आलेले डॉक्टर ही भारावून गेले.
फलटण पूर्व भागातून रेशनिंग कार्ड व रेशनिंग दुरुस्ती कॅम्प घेण्यात आला यावेळी अनेक रेशनिंग कार्डधारकांनी सहभाग नोंदवून या सेवेचा लाभ घेतला.
यावेळी एकूण १४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ६८ जणांनी नेत्र तपासणी केली त्यातील १७ जण डोळे ऑपरेशनस पात्र ठरले आहेत त्यानंतर ब्लड प्रेशर व शुगर आणि अस्थिरोगाच्या ६१ जणांची मोफत तपासणी करण्यात आली त्याचबरोबर रेशनिंग कार्डचे असणारे २७ जणांची कामे या कॅम्पमध्ये करण्यात आली.
नंदकुमार गावडे यांना सातारा जिल्हा परिषदेचे माजीअध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वास गावडे, श्रीराम बझारचे संचालक मारुती बापू गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बजरंग खटके, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुकाध्यक्ष बापूराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन दादा शिंदे, संतोष खटके ,भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशालसिंह माने पाटील, भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार ,हनुमंतवाडीचे मा.सरपंच विक्रमसिंह जाधव , आंदरुड गावच्या सरपंच सौ नंदाताई राऊत, उपसरपंच भागवत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत ( रक्तदानासह),हनुमंत गावडे पाटील , सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत खटके सोसायटीचे व्हाईस चेअरमन काशिनाथ गावडे, मा उद्धव ठाकरे प्रणीत शिवसेनेचेअजित धुमाळ निदान नर्सिंग होम चे प्रमुख डॉक्टर अमोल आटोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व गोखळी येथील आबालवृद्धांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नजीकच्या काळात बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणेसाठी सोशल मीडिया द्वारे व्हाट्सअप ग्रुप सुरू करणे, वाड्यावस्त्या वरील सर्व रस्त्यांची कामे करणे, विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन * नेता आपल्या दारी* या उपक्रमांतर्गत योजना घरोघरी पोहोचविणे, युवकांसाठी बँक कर्ज मेळावा घेणे, गावातील सर्व तंटे सामोपचाराने मिटवणे , शैक्षणिक उपक्रम राबविणे, इत्यादी उपक्रम राबविणार असल्याचे मनोगत श्री नंदू मामा गावडे यांनी व्यक्त केले. हे सर्व उपक्रम पार पाडणे कामी नंदकुमार गावडे युवा मंच चे सर्वश्री ज्ञानेश्वर घाडगे, राहुल गावडे,मुन्ना शेख, गणेश गावडे, प्रदीप आटोळे, शेखर लोंढे, स्वप्नील पवार,अमोल हरिहर, अशोक गावडे,प्रवीण गावडे, योगेश गावडे, सागर हरिहर, सचिन जगताप, माऊली तीवाटणे, राजेंद्र आटोळे, कुमार खोमणे,वैभव गावडे, सचिन गावडे, संतोष ढोबळे ,सचिन आबा गावडे मयूर हरिहर, आकाश बागाव, गणेश काशीद, निलेश गावडे,दादासो जगताप, तानाजी निकाळजे,, रामभाऊ गीते,चंद्रसेन घाडगे, सचिन धुमाळ, आदित्य कोठावळे, संदीप हरिहर, अभिषेक आटोळे, या युवकांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button