ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुका वर्धापनदिन विशेषांक प्रकाशन व गुणवंत कामगार सत्कार सोहळा संपन्न.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-8208717483

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी आशितोष चव्हाण

अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुका वर्धापनदिन विशेषांक प्रकाशन व गुणवंत कामगार सत्कार सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी केंद्रीय कार्यकारणी सदस्य व पुणे महानगर चे अध्यक्ष श्री विलासजी लेले सर, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मध्य महाराष्ट्र प्रांत सदस्या राजश्रीताई दीक्षित मॅडम, तसेच प्रमुख उपस्थिती मध्य महाराष्ट्र प्रांत सदस्य श्री केदारजी नाईक, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री जयदीपजी ठुसे, जिल्हा संघटक श्री प्रविनजी शहाणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीरा अडसूळ व वाई तालुका अध्यक्ष श्री सतीश जेबले यांच्या प्रमुख उपस्थितित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका महिला आघाडी प्रमुख सीमा भागवत व सचिव मानसी पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष श्री सतीश जेबले यांनी केले. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राजश्रीताई दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलासजी लेले यांनी अध्यक्षीय भाषणात ग्राहक पंचायत बद्दल उपयुक्त माहिती सांगून घडलेले काही किस्से देखील सांगितले. त्यांनतर गुणवंत कामगारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कामगारांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका कोषाध्यक्ष सविता चव्हाण यांनी मानले. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असणारे श्री यशवंत लेले, मनीषा घैसास मॅडम, मोहन जायगुडे, राहुल खरात, आबा नायकवडी, संजय गायकवाड, डॉ. प्रकाश पोरे, लोकमतचे वार्ताहर पांडुरंग भिलारे, कृष्णातीर साप्ताहिक चे कृष्णात घाडगे, पिंपळे सर व रत्नमाला जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक पंचायत वाई चे संघटक श्री राहुल जायगुडे, सदस्य श्री सचिन नवघणे, संदिप नवघणे, कल्पेश जायगुडे, अशोक कळंबे, मंजुषा मांढरे तसेच श्री टेक्निकल च्या विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button