अजिंठा देशमुख गल्ली येथे संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

संपादक:- प्रल्हाद चव्हाण-8208717483
दिनांक 30/4/2023 रोजी अजिंठा येथे देशमुख गल्ली येथे संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात करण्यात आली. यावेळी कथाकार ह.भ.प.श्री संतदास महाराज गिरी तोरणाळेकर यांच्या मधुर वाणी तुन वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित श्री गोपाल दास महाराज तोरणाळा श्री गणेश दास महाराज तोरणाळा श्री नारायण दास महाराज तोरणाळा गायनाचार्य श्री महेन्द्र महाराज हरणखेड श्री राजेन्द्र महाराज हरण खेड श्री अतुल महाराज पहूर इत्यादींनी महाराज लोकांची उपस्थिती होती. तसेच 30 एप्रिल 2023 ते 7 मे 2023 पर्यंत रोज रात्री आठ ते दहा या दरम्यान हरी कीर्तनाचा कार्यक्रम राहील. तसेच सकाळी चार ते सहा काकडा भजन दुपारी 12 ते 4 शिवपुराण कथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ तरी सर्व अजिंठा वाशी व पंचक्रोशीतील सर्व गावातील लोकांनी या शिव महापुराण महाकथा व अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हान कथा प्रवक्ते श्री संत दास महाराज गिरी यांनी केले आहे. यावेळी अजिंठा गावातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती तसेच या वेळी उपस्थित नरसिंगराव दादा चव्हाण शिवाजी अप्पा चव्हाण पंजाबराव बापू चव्हाण अरुण चव्हाण देशमुख सतीश गणेश राव चव्हाण श्री महेन्द्र चव्हाण अनिल देशपांडे सुजित उर्फ बाळु जाधव सुरेश भालेराव पंजाब जाधव उत्तम भाऊ चव्हाण सुरेश चव्हाण दिपक चव्हाण किशोर चव्हाण गजानन चव्हाण शुभम चव्हाण प्रकाश अप्पा चव्हाण गुड्डू चव्हाण शिवाजी चव्हाण गजानन भंडारे दिनेश चव्हाण इत्यादी लोकांची व महिलांची उपस्थिती होती तसेच सर्वांनी या शिव महापुराण तसेच उद्यापासून सुरुवात होत आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.