फलटण:-महात्मा फुले जयंती उत्सव समिती कडून पाच हजार पाणी बॉटल चे वाटप.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी आशितोष चव्हाण
महात्मा फुले जयंती उत्सव समिती कडून पाच हजार पाणी बॉटल चे वाटप.
: डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव रॅलीत वाटले पाणी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅलीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती फलटण यांच्यावतीने पाच हजार पाणी बॉटलचे मोफत वाटप करण्यात आले. महात्मा फुले चौक फलटण येथे रॅलीचे आगमन होताच रॅलीतील सर्वांना पाणी वाटप करण्यात आले
यावेळी रॅलीतील सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच संपूर्ण फलटण शहरात या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची चर्चा होत आहे. रॅली महात्मा फुले चौकातून पुढे गेल्यानंतर उत्सव समितीतील सर्व सदस्यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.
बापुराव शिंदे ,गोविंद भुजबळ ,रणजितदादा भुजबळ , बाळासाहेब अडसूळ ,गणेश तांबे ,प्रा विशाल नाळे, अमोल रासकर , संदीप नेवसे , माधव जमदाडे अक्षय तळेकर, नितीन कळसाईत शिवराज क्षीरसागर लाला चौधरी निलेश गोडसे अमोल धुमाळ यांच्या सह तरुण व कार्यकर्त्यांनी पाणी वाटप केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.तसेच इथून पुढेही नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले जातील. असे समितीतील सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले.