अहमदनगर:-वन्यप्राण्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
प्रतिनिधी अतुल भापकर अहमदनगर:-9607009988

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अतुल भापकर अहमदनगर
वन्यप्राण्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
उन्हाची तीव्रता वाढली : गुंडेगाव येथील ग्रामस्थांचा उपक्रम… —————————————-
तालुका प्रतिनिधी :- आपण पहातो समाजातील अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत असतात. आपापल्या परीने मानवतेचे दर्शन घडवत असतात.असाच एक आदर्श गुंडेगाव ग्रामस्थांनी घालून दिला आहे.खरे पाहता आज मानव ,पशु, पक्षी, सूक्ष्म जीव या सर्वांना जगण्यासाठी किमान अन्न आणि मुख्यतः पाण्याची गरज असते.परंतु माणसाच्या स्वार्थापायी,चंगळवादी स्वभावामुळे जंगली प्राणी व पक्षी स्वतःच्या जगण्या पुरते आवश्यक असलेल्या पाणी व अन्नापासून वंचित राहत आहेत.सध्या नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवार हे बारकाईने पाहिले असता हरणाचे काही कळप डोंगरात पाण्याच्या शोधार्थ भटकताना दिसत आहेत. पंचटेकडी परिसर,कोथूळ डोंगर,शुढळेश्वर परिसरात झाडे मोठया प्रमाणात रुक्ष झालेले आढळत आहेत.वाळलेले झाडे तसेच पाणी या सर्वाचा परिणाम या पट्ट्यात कमी झालेले जंगली श्वापदे, पक्षी, प्राणी होय. याचे मुख्य कारण पाणी व अन्न होय.म्हणूनच अशा या उन्हाळ्याच्या काळात आपलाही काही खारीचा वाटा म्हणून वन्यजीवांच्या (विशेषतः हरीण) पाणी पिण्यासाठी व्यवस्था करण्याचा विचार गुंडेगाव ग्रामस्थांच्या मनात आला आणि लगेच ग्रामस्थांनी स्वतः वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्वारे वनविभागाच्या हद्दीतील वनविभागाने तयार केलेला पाणवठ्यावर पाणी पुरवठा केला. अंदाजे २०००० लीटर पाण्याचा वन्यप्राण्यांना पाणीपुरवठा केला. फुल ना फुलाची पाकळी च्या मदतीने अगदी काही तासातच अनेक हरीण तेथे पाणी प्यायल्याने त्यांना समाधान वाटले गुंडेगावचा हा छोटासा उपक्रम पूर्ण एप्रिल मे जून पर्यंत किंवा पावसाळा सुरू होई पर्यंत सुरू ठेवण्याचा संकल्प आहे असे त्यांनी सांगितले.
चौकट….
“गावाला ८५० हेक्टर वनक्षेत्र आहे व सध्या उन्हाचे तापमान वाढल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी मी वन पाणवठ्यावर नियमित टँकर द्वारे पाणी पुरवठा करणार आहे.मुक्या प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही..”
शेतकरी गुंडेगाव
वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यावर टँकरद्वारे पाणी पुरवठा करताना गुंडेगाव ग्रामस्थ.