खटाव:-स्वाभिमानी संघटनेने बाजार समिती निवडणूकीत फुले जयंतीनिमित्त ओढला शेतकऱ्यांचा आसूड.
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
स्वाभिमानी संघटनेने बाजार समिती निवडणूकीत फुले जयंतीनिमित्त ओढला शेतकऱ्यांचा आसूड.
कटगुण : खटाव तालुक्यातील वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड ओढला आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते निवडणूक लढविण्यास सिद्ध झाले आहेत.
संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सूर्यकांत भुजबळ, जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, दत्तू घार्गे
तानाजी देशमुख, सूर्यभान जाधव, शरद खाडे, सचिन पवार, संतोष तुपे यांच्यासह बाजार समिती निवडणुकीतील उमेदवार आणि गावच्या शाखेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि कटगुण ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने हनुमंतराव गायकवाड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा स्वागत सत्कार केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरीच निवडून गेले पाहिजेत हा आग्रह धरत वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला कोणताच राजकीय पक्ष वाली राहिलेला नाही, भविष्य काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांना आपल्या हक्काची वाटेल असं काम करवून दाखवू असे युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख म्हणाले.
शेतकऱ्यांचे पैसे अडकले, मालाचा लिलाव होत नाही अशावेळी अनेकदा वडूज बाजार समितीमध्ये संघटनेने आंदोलन करून शेतकऱ्यांना फायदे मिळवून दिले आहेत. या बाजार समितीमध्ये वाईट चालीरीती आणि प्रथा बंद करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते निवडून देण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे , सूर्यभान जाधव यांनी केले. यावेळी संघटनेचे उमेदवार सुदाम लावंड, युवराज पवार, संतोष तुपे, सत्यवान गलांडे,काकासाहेब सजगणे,सुभाष जाधव, बापुसो पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. इतर पक्षांच्या आघाड्या आणि युतीची चर्चा असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, वडूज शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्यास बरे वाटले असे कोरेगाव – खटावचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी खटाव विकास आघाडी होत असेल तर स्वागत आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे
——————————+++————————-
फोटो – राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या कुलभुमित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार आरंभ,,,( छाया सूरज पोतदार, वडूज)