खटाव:-हनुमान यात्रेनिमित्त होळीचा गाव येथे बैलगाडी शर्यतीत : प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो चोराडेकरांचा नंद्या व शेनवडीकराचा मिल्खा
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव
हनुमान यात्रेनिमित्त होळीचा गाव येथे बैलगाडी शर्यतीत :
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो चोराडेकरांचा नंद्या व शेनवडीकराचा मिल्खा.
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील होळीचा गाव येथील हनुमान यात्रेनिमित्त रविवारी ओपन व आदत बैलगाड्यांचे जंगी शर्यती भरवण्यात आल्या होत्या. अनेक वर्षांपासूनची गाड्यांच्या शर्यतीची परंपरा असणाऱ्या हनुमान यात्रेला बैलगाड्यांच्या आखाड्यात शंभर हून अधिक गाड्या पळवण्यात आल्या. या मैदानातील फायनलचा प्रथम क्रमांक ५१ हजाराचा मानकरी ठरला तो बापूरावशेठ पिसाळ चोराडेकरांचा नंद्या व अभिजित साळुंखे यांचा मिल्खा तर द्वितीय क्रमांक ४१ हजाराचा मानकरी विराज इनामदार हिगणगाव, तृतीय क्रमांक ३१ हजाराचा मानकरी ज्योतिर्लिंग प्रसन्न नरवणे, चतुर्थ क्रमांक २१ हजाराचा मानकरी श्री सिद्धनाथ प्रसन्न व सुरेश देशमुख होळीचा गाव, पंचम क्रमांक ११ चा मानकरी अधिरा घार्गे येळीव यांनी मान पटकवला.
सालाबादप्रमाणे श्री हनुमान यात्रेच्या दिवशी रविवारी होळीचा गावच्या शर्यतीच्या आड्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सकाळी दहा वाजल्या पासून येतील तसे गाड्यांची नोंद करण्याचे काम सुरु होते. बैलगाड्यांचे चालक व मालक मैदानावर आल्यावर आपली गाडी नोंद करण्यात मग्न होते. बैलगाड्या शर्यती सुरु झाल्यानंतर गाडी शौकिन आपली आवडती बैल जोडी घेऊन एकामागे एकेक करून मैदानात येत होते.
सर्जा राजा असा आवाज घुमू लागला होता. जसजशे गाड्यांचे राऊंड पळत होते तसतशी अड्डा पाहण्यासाठी प्रेक्षकांचा व गाडी शौकिनांची गर्दी वाढू लागली होती.
तरी यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनामुळे बैलगाडा आड्डा यशस्वीरित्या पार पडला.
फोटो :-
——होळीचागाव येथे फायनलचे १ नंबर बक्षीस माजी. पं. समिती सदस्य भाऊसाहेब लादे यांचे हस्ते स्वीकारताना रामदास पिसाळ, शांताराम पिसाळ,आदी ग्रामस्थ