आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-चौधरवाडी येथे चार दिवसीय कीर्तन महोत्सव.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
चौधरवाडी येथे चार दिवसीय कीर्तन महोत्सव.
फलटण
चौधरवाडी ता फलटण येथे दिनांक २० मार्च ते २३ मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक आणि शैक्षणिक विचारमंच चौधरवाडी यांच्या वतीने आयोजित भव्य कीर्तन महोत्सवात बुधवारी पहिल्या दिवशी भोकरदन येथील हभप संतोषजी आढवणे महाराज गुरुवारी पंढरपूर येथील हभप चंदाताई त्रिवाडी महाराज शुक्रवारी जुन्नर येथील हभप पांडुरंग गिरी महाराज वावीकर तर शनिवारी फलटणच्या कन्या हभप नम्रताताई कर्वे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
चौधरवाडी येथे आयोजित कीर्तन महोत्सवात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच तथा विचारमंच चे अध्यक्ष तुकाराम कोकाटे यांनी केले आहे विविध व्यख्यान परंपरे नंतर कीर्तन महोत्सवाचे प्रथमच चौधरवाडी येथे आयोजन होत आहे तरी सर्व पंचक्रोशी तसेच फलटण तालुक्यातील नागरिकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा.