निफाड:-तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त धर्म ध्वजारोहण सोहळा.
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक
तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त धर्म ध्वजारोहण सोहळा.
निफाड तालुक्यातील भरवस फाटा (दहेगाव) येथे श्री जगद्गुरु तुकोबाराय ञिशतक अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण व धर्म ध्वजा रोहन सोहळ्याचे आयोजन भरवस फाटा(दहेगाव) तालुका निफाड या ठिकाणी करण्यात आले आहेत दिनांक२६\२\२०२४ वार सोमवार या दिवशी भरवस फाटा (दहेगाव) येथे धर्म ध्वज फडकविण्यात येणार आहे या सप्ताह निमित्ताने श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा वैकुंठ गमन सोहळ्यास यावर्षी ३७५ वर्ष होत आहे हा सोहळा दिनांक २ते९ एप्रिल या सुवर्णकाळात निफाड तालुक्यातील भरवस फाटा (दहेगाव) येथे होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये२४ संत तुकाराम नामाचा जप अखंड पहारा अखंड भजन होणार आहे तसेच५००टाळकरी ५० मृदुंग वादक ही कीर्तन सेवा देणार आहे या सोहळ्याचे सर्वप्रथम मानाचे श्रीफळ नाशिक जिल्ह्याला मिळाले आहे या सोहळ्यास आद्य शंकराचार्य स्थापित च्या धर्मपिठातील जगद्गुरुंना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे या सोहळ्यात सुंदर असा तो क्षण म्हणजे तुकोबारायांचे वंशज या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निफाड येवला चांदवड सिन्नर कोपरगाव या तालुक्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे तसेच तुकोबारायांचे जीवन चरित्र कथा व गाथा पारायण होणार आहे तसेच जिल्ह्यांतर्गत तालुक्यातून प्रत्येकी एक आदर्श कीर्तनकारास धन्य तुकोबा समर्थ हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे