ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

रहिमतपूर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत पिसाळ यांची निवड.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

रहिमतपूर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत पिसाळ यांची निवड.

भाजप पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार श्रीकांत पिसाळ यांचे वक्तव्य.

पुसेसावळी दि.26 प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी रहिमतपूर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत पिसाळ यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माण -खटाव चे आमदार जयकुमार गोरे सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मंडलातील निवडी नुकत्याच जाहीर केल्या त्यामध्ये रहिमतपूर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत पिसाळ यांना जबाबदारी देण्यात आली. यावेळी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ रहिमतपूर नगरपालिका विरोधी पक्षनेते निलेश माने माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, के एम शुगरचे संचालक विक्रम घोरपडे, गणेश घोरपडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती या निवडीनंतर भाजपा रहिमतपूर मंडल युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत पिसाळ म्हणाले की पक्षाने दिलेल्या संधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे मार्गी लावणे त्याचबरोबर भाजपा पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवने तसेच कराड उत्तर मतदार संघामधील रहिमतपूर मंडलातील येणाऱ्या गावांमध्ये भाजप पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली यावेळी माजी सो.चेअरमन विजय पिसाळ, सचिन पिसाळ फौजी, माजी सोसायटी सदस्य विलास पिसाळ, भाजपा रहिमतपूर मंडल वाहतूक विभाग अध्यक्ष मच्छिंद्रनाथ पिसाळ, संजय अवघडे, चंद्रकांत पिसाळ, अक्षय घाटगे, दिनकर पिसाळ, अण्णासो साळुंखे, वामन अवघडे, प्रशांत पिसाळ, अशोक पिसाळ, दैनिक ऐक्य चे पत्रकार श्रीकांत पिसाळ, अण्णासो पिसाळ, संभाजी कुंभार, संजय चव्हाण, अभिजीत पिसाळ, सुनील पिसाळ, दादासो जानकर, आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button