खटाव:-मायणी परिसरात दुपारी उन्हाचे चटके; सायंकाळी ढगाळ वातावरण; तर पहाटे थंडी एकाच दिवसात तिन ऋतूचा फील.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रा दिलीप पुस्तके सातारा (जिल्हा विभाग प्रमुख)
मायणी परिसरात दुपारी उन्हाचे चटके; सायंकाळी ढगाळ वातावरण; तर पहाटे थंडी एकाच दिवसात तिन ऋतूचा फील.
मायणी प्रतिनिधी__सध्या मायणी परिसरात दुपारी तापमान 35 ते 38 सेल्सिअस वर गेल्याने उन्हाचे चटके भाजू लागले आहेत. तर सायंकाळी सहा ते सात या काळात ढगाळ वातावरण व वारा सुटतो. तर सायंकाळी थंडी जाणवते पहाटे फिरायला जाणाऱ्या माणसांना स्वेटर घ्यावा लागतो. तसेच उन्हाचा चटका असल्याने जनावरे आजारी पडली आहेत. अनेकांनी आपले गोटे पालापाचोळ्याने आच्छादून घेतले आहेत तर अनेक जण दुपारच्या वेळेला जनावराच्या अंगावर फाटके भिजलेली बारदानी टाकून ठेवत आहे. या विचित्र हवामानामुळे सध्या नागरिक थंडी ताप कणकण सर्दी यांनी आजारी पडली आहे. त्यामुळे दवाखाने फुल भरलेले आहे ही परिस्थिती मे जून अखेर राहिली तर साथीचे रोग पसरण्यास वेळ लागणार नाही. तरी आरोग्य विभागाने सतर्क राहून सर्वे करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी सांगितले.