क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी येथे उत्साही वातावरणात रामनवमी साजरी.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मायणी येथे उत्साही वातावरणात राम नवमी साजरी.

मायणी प्रतिनिधी__मायणी येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमाचे सांगता तसेच श्रीराम जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. रामनवमी व गुरुपुष्यामृत योग जुळून आल्याने हा योग अतिशय शुभ असल्याने भाविकांनी श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर येथे गर्दी केली होती. येथील उभ्या पेठेतील हनुमान मंदिरात सकाळी आरती दुपारी पाळणा व श्रींचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी महिलांनी खूपच गर्दी केली होती तसेचथोरात वस्ती येथील श्रीराम मंदिरात पूजाअर्चा पाळणा इत्यादी विधी झाल्यानंतर सकल हिंदू तरुण कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. तसेच श्रीराम मंदिरातील ज्योत आणून श्रीरामाच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अश्वदल हत्ती धनगर गजी मंडळ तसेच तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. यावेळी प्रभू रामचंद्र की जय सिताराम की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. संपूर्ण मायणी परिसर श्रीराम मय झाला होता. यावेळी भक्तामध्ये बऱ्याच वर्षानंतर हिंदू समाज एकत्र आल्याने उत्साहाचे आनंदाचे भक्तीचे वातावरण पसरले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाना कारंडे व भूषण माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button