कराड:-राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर लक्झरी बस पेटली…….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर लक्झरी बस पेटली…….
कराड दि: मिरज या ठिकाणाहून मुस्लिम बांधव हाच यात्रेसाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणासाठी लक्झरी बसले निघाले होते. बुधवारी रात्री अचानक या लक्झरी बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण लक्झरी बस जळून खाक झाली. परंतु ,सुदैवाने काळजी घेतल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत माहिती अशी की, लक्झरी बस चालक फारूक अली हे मिरज या ठिकाणाहून मुंबईला जाण्यासाठी लक्झरी बसणे निघाले होते . बेंगलोर पुणे महामार्ग वर तुरळक वाहने होती. अशावेळी कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्या नजीक बसचा वेग मंदावल्यानंतर टोल भरण्यासाठी ते थांबण्याच्या बेतात होते . इतक्यातच लक्झरी बसच्या मागील चाकातून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बस चालकांनी बस सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊन तपासणी केली असता मागील चाका जवळ असलेल्या वायर तुटल्याने आगीच्या ज्वाला भडकत होत्या. त्यामुळे तातडीने त्यांनी बसमधील हाज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम प्रवाशांना तसेच त्यांच्या मौल्यवान साहित्य व इतर सामान स्थानिकांच्या मदतीने बस गाडीतून सुखरूप बाहेर काढले. आणि तातडीने दुसऱ्या लक्झरी बसणे या प्रवाशांना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत घेऊन जाण्यासाठी हालचाली केल्या.
तोपर्यंत या बसने संपूर्ण पेट घेतला. बस पेटत असल्याचे समजल्यानंतर अनेकांनी ही आग विझवण्यासाठी मदत केली. त्यानंतर कराड नगरपरिषद व साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या वतीने पेटणाऱ्या बसवर पाण्याची फवारणी करून ही बस विझवण्यात यश आले. वास्तविक पाहता उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे काही वाहने पेटण्याचे प्रकार घडतात. परंतु थंडी असताना सुद्धा या लक्झरी वाहनाने पेठ घेतला .तो एक चर्चेचा विषय झालेला आहे.
या बस मध्ये हाच यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांनी कोणती जीवित हानी न झाल्यामुळे अल्लाहचे स्मरण करून प्रार्थना केली. सदरच्या घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून सर्वजण सुखरूप असल्याने मदत कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना व स्थानिक रहिवाशांना ही दिलासा मिळाला आहे. सदर घटनेमुळे लक्झरी बसचा फक्त सांगाडा उरला होता.
———————–+————————-
फोटो -राष्ट्रीय महामार्ग नजीक तासवडे टोलनाक्यावर लक्झरी बसणे पेट घेतला.