पुणे मुबई द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात-सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर
पुणे मुबई द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
शनिवार दिनांक १८ मार्च रोजी सकाळी साडेसात च्या सुमारास यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला असून सुदैवाने कोणत्याही परकारची जीवित हानी मात्र झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुंबई हून पुण्याच्या दिशेने जाणारी गाडी क्र. 23BH5560A KIA ही गाडी सकाळी साडे सात च्या सुमारास सोमाटणे एक्झिट इथे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गार्ड रेल ला धडकली धडक इतकी भीषण होती कि गार्ड रेल पूर्णपणे गाडीच्या आरपार निघाला या मध्ये गाडीचा चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी मात्र झालेली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामधील जखमींना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरु आहेत.