नेवासा:-विषारी तन नाशक फेकून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकऱ्या चा उपोषणाला बसण्याचा इशारा.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
नेवासा तालुक्यातील धामोरी येथे कपाशी पिकावर विषारी तननाशक फेकून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान.
नेवासा तालुक्यातील धामोरी गावातील शेतकरी श्री राहुल रूपटक्के यांची जमीन आहे सध्या कपाशी पीक उभे आहे त्यातच काही अज्ञात व्यक्ति ने कपाशी पिकावर अत्यंत विषारी असे तननाशक किंवा पिक जळून जावे अशा हेतुने नुकसान केली गेली
. अशातच दुष्काळ परिस्थिती . त्यात पाऊस नाही . कधीकधी कापसाला भाव नसतो पिकांचे पंचनामे होतात पण ते फक्त कागदा पुरते मर्यादित राहतात जर हे अशेच चालू राहीले तर शेतकरी ह्या जगातुन संपून जाईल .
सदर घटनेत शेतकऱ्याचे जाणून बुजून नुकसान केले गेल्याचे दिसून येत आहे . बर्याच सऱ्याचे नुकसान दिसतेय सदर घटनेतील जो कोणीही आरोपी असेल त्याचा लवकरात लवकर शोधून अटक करावी. व पिकाचा पंचनामा करून शासनाने मला नुकसान भरपाईची मदत करावी अन्यथा मी राहुल रूपटक्के व माझे संपुर्ण कुटुंब तहसील कार्यालय येथे उपोषण करण्यासाठी बसु ‘ तरी पुढील सर्व घटनेला सरकार जबाबदार राहील . तरी कृपया तहसीलदार साहेब यांना विनंती आहे की त्यांनी हया घटनेची गंभीर दखल घ्यावी . व या गरिब शेतकऱ्याला न्याय व मदत मिळवुन द्यावी