ताज्या घडामोडी

सातारा:-झाडानी प्रकरणी चौकशी अधिका-यांची नियुक्ती- सुशांत मोरे.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )

झाडानी प्रकरणी चौकशी अधिका-यांची नियुक्ती- सुशांत मोरे.

सातारा दि:
सहयाद्री वाचवा मोहिमेतंर्गत माहिती अधिकार, सामाजिक, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या लढ्याला यश आले. झाडणी प्रकरणी चौकशी अधिकारी च नियुक्ती केल्यामुळे
या प्रकरणे आता झाडाझडती सुरू झालेली आहे.
गेल्या वर्षी १५ मे २३ रोजी श्री.मोरे यांनी झाडाणी प्रकरण उजेडात आणले होते. हे प्रकरण आता निर्णायक वळवणावर आले आहे. गुजरात राज्यातील जी.एस.टी. आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह इतरांची कमाल जमीन धारणेतंर्गत चौकशी करण्यासाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच याची चौकशी होऊन शासनास त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.

झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जी.एस.टी. आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते. याप्रकरणी श्री. मोरे यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ नुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेची कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांना नोटीस काढली होती. त्यानंतर याप्रकरणी अनेक मान्यवर सुनावणीसाठी हजर झाले होते. त्यावेळेस उच्च स्तरावर चौकशी होण्यासाठी अधिका-यांची नेमणुक करण्याचा निर्णय झाला होता. त्याची आता अंमलबजावणी झाली आहे . संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना लवकरात लवकर शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश सहसचिव अजित देशमुख यांनी दि १३ जानेवारी २०२५ रोजी दिले आहेत.
चंद्रकांत वळवी यांच्या जमीन धारणा मर्यादेची तपासणी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी, रायगड यांची नेमणूक करण्यात आली आहे . त्यांना तीन आठवड्यात अहवाल द्यावा लागणार आहे. अनिल विसावे प्रकरणात अपर जिल्हाधिकारी नंदुरबार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत १५ दिवसात अहवाल, तर पियुष बोंगीलवार यांच्या जमिनीच्या तपासणीबाबत अपर जिल्हाधिकारी, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना याप्रकरणी चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी श्री.मोरे यांच्या सुरु असलेल्या लढ्याला यश आले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

———————————————-

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button