कराड:-स्व.यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास कौतुक व पारितोषिक वितरण सोहळा कराड येथे संपन्न.
प्रतिनिधी रईस शेख सातारा:-9970112671

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
स्व.यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धा सन २०२२-२३ जि.प.सातारा अंतर्गत विद्यार्थी कौतुक व पारितोषिक वितरण सोहळा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे संपन्न झाला. लोकनृत्य – मोठ्या गटाचे पारितोषिक स्वीकारताना जि.प.शाळा,शिरगावचे मुख्याध्यापक श्री.राजाराम मोरे सर, मार्गदर्शक शिक्षक श्री.विजय साठे सर व सर्व विद्यार्थ्यीनी. शिरगाव शाळेच्या सौ.छाया गायकवाड मॅडम व सौ.रूक्सार भालदार मॅडम यांचे देखील मुलांना मार्गदर्शन मिळाले.त्याबद्दल सन्माननीय शबनम मुजावर मॅडम शिक्षणाधिकारी प्राथ. जि. प. सातारा, श्री.सुधीरजी महामुनी गटशिक्षणाधिकारी, पं. समिती,वाई , श्री.साईनाथ वाळेकर व श्री.विष्णू मेमाणे ,शिक्षण विस्तार अधिकारी, श्री.रविंद्र बाबर, केंद्रप्रमुख ,शाळा व्यवस्थापन समिती शिरगाव चे अध्यक्ष श्री.नितीन भोसले व सर्व सदस्य, सरपंच-उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत, शिरगाव, ग्रामस्थ व पालक , शिरगाव या सर्व मान्यवरांनी यशस्वी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.