नाशिक:- वाई द्रविड हायस्कूलमधील आरती गायकवाड हिने राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8209717483.
आरती गायकवाड हिने राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक.
३१ वी महाराष्ट्र ज्युनियर व ३४ वी महाराष्ट्र सीनियर क्योरुगी तायक्वांदो स्पर्धा २०२२-२३ चे
आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व
इंडिया तायक्वांदो वर्ल्ड तायक्वांदो महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांनी केले होते.ही स्पर्धा नाशिक येथे भरवण्यात आली होती या स्पर्धेमध्ये द्रविड हायस्कूल वाई ११ वी कॉमर्स मधील विद्यार्थिनी कु.आरती अरुण गायकवाड ४६ ते ४९ या वजन गटामध्ये कास्य पदक पटकावून विजय प्राप्त केला आहे.राज्य स्तरीय तिला हे पदक मिळाले आहे ती ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट अकॅडमी शेंदुरजने, या संस्थेमधील ती विद्यार्थिनी आहे. तीचे प्रशिक्षक विशाल कुमठे होते तसेच तिला ओमकार कांबळे, धीरज गायकवाड, स्वप्निल पवार, श्रीधर कदम,दर्शन चव्हाण, सुधीर शिंदे, अशोक पवार, अमृता शिवदे मॅडम , सोनम माने मॅडम,नागेश मोने मुख्याध्यापक, रवींद्र वीर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.तसे पाहता
शस्त्रे न मार्शल कला म्हणजे तायक्वांदो या खेळाची सुरुवात कोरिया या देशांमध्ये झाली काही लोक मार्शल आर्ट्स चा उल्लेख करतात जे घटक तायक्वांदो त्यामध्ये समान आहे तो मोठ्या प्रमाणात आढळून येतात या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धेत २००० साली सहभाग झाला सुपर,हलके प्रकार, मध्यम आणि जड वजन असे लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात व ही कला आत्मसात करू शकतात त्यामुळे पुरुष असो किंवा महिला या स्वयं संरक्षण यासाठी या कलेचा वापर करतात तायक्वांदो मुळे एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास देखील वाढतो मुली व महिलांच्या विरुद्ध वाढता हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलींना तायक्वांदो मार्शल कला शिकवण्यासाठी पाठवले पाहिजे.