आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेश
छञपती संभाजीनगर:- G20 सुमित परदेशी पाहुणे शहर भ्रमंतीवर; बीबी-का-मकबरा पिहुणे म्हणाले ‘वाह ताज!’
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे छ.संभाजीनगर:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
छत्रपती संभाजीनगर : जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदे अंतर्गत वुमन-२० परिषदेसाठी ऐतिहासिक आणि पर्यटननगरीत दाखल झालेल्या पाहुण्यांनी मंगळवारी सकाळी ‘दख्खन का ताज’ म्हणून ओळख असलेल्या बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणीला भेट दिली.मकबरा पाहून ‘ वाह ताज’ अशी प्रतिक्रिया परदेशी पाहुण्यांनी दिली.
पाहुण्यांनी प्रारंभी औरंगाबाद लेणीला भेट दिली. त्यानंतर
बीबी का मकबरा येथे भेट दिली. बीबी का मकबरा येथे गुलाबपुष्प देऊन प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक डाॅ. शिव कुमार भगत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहायक संजय रोहणकर आदींची उपस्थिती होती.