पुणे पिंपरी:-‘वंचित’ भाजपची ‘बी’ टीम बनली आहे – देवेंद्र तायडे
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
‘वंचित’ भाजपची ‘बी’ टीम बनली आहे – देवेंद्र तायडे
पिंपरी, दि. 25 (शफिक शेख) :- ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी’ टीम बनली असून देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार करावे लागेल. त्यामुळे आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेशावेळी सांगितले. तायडे यांनी केलेल्या पक्षांतरामुळे नाना काटे यांच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह चिंचवड विधानसभा निरीक्षक सुनील आण्णा शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रदेश युवक चे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मराठवाडा विकास संस्थेचे अरुण पवार, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रवेशावेळी बोलताना तायडे म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात देशातील वंचितांच्या शोषणाची परिसीमा गाठली आहे. देशात भाजपकडून हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वंचित बहुजन विकास आघाडीने भाजपला पूरक ठरणारी भूमिका या मतदार संघात घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे वंचित घटकाच्या संरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला मदत करणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.
वंचित हा पक्ष भाजपाची बी टीम बनल्याचे सांगत तायडे पुढे म्हणाले, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी समविचारी असणाऱ्या महाविकास आघाडीसोबत असणे आवश्यक असल्याचे सर्वच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपल्यातील मतांची विभागणी ही भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरत आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ही विभागणी आम्ही टाळणार आहोत.
शहरात बाळसे धऱण्यापूर्वीच शिंदे यांच्या शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले असून शिंदे गटातील अभिषेक दांगट यांनी नाना काटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपसारख्या पक्षाला सत्तेतून हद्दपार करणे व लोकशाहीच्या हितासाठी आपण नाना काटे यांना मताधिक्य मिळवून देऊ असे दांगट यांनी प्रवेशावेळी सांगितले.