क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपीच्या औंध पोलीसांनी मुसक्या आवळून केले जेरबंद.

प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपीच्या औंध पोलीसांनी मुसक्या आवळून केले जेरबंद.

औंध पोलीस ठाणे हद्दीत मौजे चोराडे ता. खटाव गावी चोराडे ते म्हासुर्णे रोडवरील कुंभार पेट्रोलीयम सेल्स ॲण्ड सर्व्हिसेस या पेट्रोलपंपावरील काम करणारा कामगार संजय गंगाराम अडागळे वय २९ वर्षे हा दिनांक २४/०१/२०२३ रोजी सकाळी ११.२० वा.चे सुमारास कलेक्शन झालेले ९८, ४७०/- रुपये ची कॅशची पिशवी घेवून निमसोड येथे जाणेकरीता निघाला असता चोराडे बाजकडून म्हासुर्णे बाजूकडे जाणारे रोडने एका अनोळखी मोटार सायकल स्वाराचे मोटारसायकल वरुन जात असताना म्हासुर्णे बाजूकडे ३०० मीटर अंतरावर गेलो असता त्याने मोटार सायकल थांबवून एकाने माझे तोंड दाबून धरले. व मला हाताने मारहाण दमदाटी करून कॅशची पिशवी घेवून दोघेजण मोटारसायकल वरुन पळून गेले.. वगैरे मजकूरचा गुन्हा दाखल झाल्याने सदर गुन्ह्याचे तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे औंध पोलीस ठाणेचे प्रभारी स.पो.नि. दराडे व त्यांचे सहका-यांनी सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत सी. सी. टी. व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणा आधारे तीन आरोपी निष्पन्न केले. सदर दोन आरोपीस कराड येथून ताब्यात घेवून अटक करुन आरोपीकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी ३३,०००/- रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली असून आणखी एक आरोपीचा शोध घेवून सदर आरोपीस अटक करुन उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करीत आहोत. मिळाला मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.

औंध पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, मागील महिन्यापासून औंध परीसरात, अनेक घरफोड्या, ट्रॅक्टर चोरी,अशा अनेक चोऱ्या करण्यास चोरटे यशस्वी झाले होते, मात्र औंध पोलीस ठाण्या दत्तात्रय दराडे या धडाकेबाज पोलिसाची इट्रीं झाल्यापासून औंध पोलीस चांगली कामगिरी करत आहेत.त्यामुळे भुरट्या चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. चांगल्या कामगिरीमुळे सर्वसामान्य जनतेतून औंध पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक, सो. श्री. बापू बांगर यांचे सुचनेनुसार मा. उपविभागीय पोलीस अधि. दहिवडी विभाग कॅम्प वडूज श्री. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आंध्र पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहा. पोलीस फौजदार बी.एन. जाधव. पो.हवा.पी.पी.पाटील ब.नं.५८१, पो.हवा. आर. एस. वाघ ब.नं. ११२९. पो.ना.एस.एच.पाडळे ब.नं. २३५४, पो.ना. आर. एस. सरतापे ब.नं.६८३. पो. कॉ. के. एल. जाधव ब.नं.२६११, पो.कॉ.के.एन. हिरवे ब.नं. ५१० यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button