क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औरंगाबाद:-टँकर मधून गळालेल्या केमिकल्स स्पोटात तरुण ठार .
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबाद:-येथील हरसुल परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे टँकर मागे घेताना त्यामधील केमिकल खाली पडून झालेल्या स्फोटामुळे एक तरुण मजूर ठार तर आई वडील व भाऊ जखमी झाले आहे रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे टँकर चालकावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्सूल परिसरातील चेतना नगर जवळील वीटभट्टीवर ही घटना घडली भावनेश नंदू पवार वय वर्ष 19 राहणार बिडकीन तालुका पैठण हल्ली मुक्काम चेतन नगर वीटभट्टी असे मृत तरुणाचे नाव आहे तर नंदू पवार वय वर्ष 45 चंदा पवार वय वर्ष 40 व योगेश पवार वय वर्ष 17 असे जखमींची नावे आहेत