ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-शैक्षणिक दृष्ट्या जीवन यशस्वी करा :- डाॅ. आलम

प्रतिनिधी:- रफिक शेख पुणे :-9021132121

शैक्षणिक दृष्ट्या जीवन यशस्वी करा :- डाॅ. आलम

पुणे, दि. 6 (रफिक शेख ) :- पुणे येथील प्रसिद्ध डाॅक्टर आणि कित्येक पुस्तकांचे रायटर ब्रिगेडियर डाॅ. मुख्तार आलम यांचे 19 वे इंग्रजी पुस्तक “Frequently asked questions on Islam” चा वितरण सोहळा मोलेदिना हाॅलमध्ये मोलेदिना हायस्कूल अँड ज्युनियर काॅलेजचे चेअरमन रियाज अहमद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी प्रोफेसर हारुण आलम, ग्रुप कॅप्टन शमशेर आलम, प्रिन्सिपल मोलेदिना स्कूलचे सय्यद शाह निदा परवेज, सुपरवायझर समीर पठाण आदि उपस्थित होते.

यावेळी डॉ. मुख्तार आलम म्हणाले इस्लाम धर्मात प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे. जो शिकेल तो जीवनात पुढे पुढे जाईल. सुशिक्षितपणाने शैक्षणिक रित्या बोलण्याचा व राहण्याचा अंदाज येतो. त्यांनी यावेळी शिक्षकांना सुध्दा एक संदेश दिला की विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याकडे लक्ष द्यावे.

प्रोफेसर हारुण आलम म्हणाले शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुजन आहेत. विद्यार्थ्यांनी सुध्दा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चांगले शिक्षण घेऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याकडे लक्ष द्यावे.

यावेळी मोलेदिना हायस्कूल, लेडी हवाबाई हायस्कूल, आणि अंजुमन इस्लाम पीर मुहंमद दोस्त मोहंमद हायस्कूल मधील पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांकाचे स्कॉलरशिपमध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रास्ताविक अब्दुर्रहमान हन्नूरे यांनी केले तर आभार तबस्सुम हाश्मी यांनी मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button