सिंधुदुर्ग:-मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य अध्यक्षतेखाली कोकण विभागातील अधिकारी यांची आढावा बैठक.
पत्रकार शैलेश मिस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1) सावंतवाडी:-बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यान वर कारवाई.

तिघांकडून १ लाख ४७ हजार ४८० रुपयांची दारूसह १६ लाख ४७ हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पहाटेच्या सुमारास विलवडे येथे करण्यात आली.
2) वेंगुर्ला:-महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कार्यशाळा वेंगुर्ला येथे संपन्न.

यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
3)दोडामार्ग:-दोडामार्ग तालुक्यात हैदोस घालणारे वन्य हत्ती अखेर सावंतवाडी तालुक्यात.

भिकेकोनाळ, कळणे मार्गे ओंकार हत्ती डोंगरपाल, डिंगणे गावात शुक्रवारी रात्री पोहचला आहे. त्यामुळे आज शनिवारी वनविभागा मार्फत डोंगरपाल व डिंगणे गावात नागरिकांना स्पीकर द्वारे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे डोंगरपाल, डिंगणे गावातील शेतकरी, ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
4) मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे
मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य अध्यक्षतेखाली कोकण विभागातील अधिकारी यांची आढावा बैठक.

सावंतवाडी : महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कोकण विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत कोकण विभागातील महसूल, जमीन, नोंदणी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. बैठकीला शिक्षणमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांची विशेष उपस्थिती होती.




