पुसेसावळी:-(खटाव)-राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी यांच्या वतीने गुरुपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी यांच्या वतीने गुरुपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी.
पुसेसावळी ( खटाव ):- राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी थोरवेवाडी ता. खटाव, जि. सातारा यांनी अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली.
गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांचे पहिले गुरू आई वडील असतात यासाठी शाळेने विद्यार्थ्यांचे आई-वडील यांना शाळेत बोलवून त्यांचे पाय धुऊन विद्यार्थ्याकडून कडून पूजन करण्यात आले. यावेळी पालक भावुक झाले होते. या अनोख्या उपक्रमासाठी सर्व पालकांनी शाळेचे आभार मानले.तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमेवर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सचिव सौ.अश्विनी सावंत मॅडम, मुख्याध्यापक श्री हणमंत ठोंबरे सर, सुपरवायझर सौ.कविता भोसले, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. नम्रता कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कोमल यादव यांनी केले. आभार श्री. संदीप भंडारे सर यांनी मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.