पुणे निगडी:-शेवटपर्यंत ‘रिक्षा बंद चक्काजाम’ला आमचा पाठिंबा राहील – इरफान नैसर्गी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
शेवटपर्यंत ‘रिक्षा बंद चक्काजाम’ला आमचा पाठिंबा राहील – इरफान नैसर्गी.
निगडी, दि. 28 (शफिक शेख):- वंचित बहुजन वाहतुक आघाडी पिपंरी-चिंचवड शहराध्यक्ष इरफान नैसर्गी यांनी सर्व रिक्षा संघटनांनी एकत्रितपणे अवैधपणे वाहतूक करणा-या ओला, उबेर, रॅपिडो आणि बाईक टॅक्सी यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘रिक्षा बंद चक्काजाम’ला संपूर्ण वंचित बहुजन वाहतूक आघाडी पिंपरी-चिंचवड च्या वतीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी या लढयामध्ये शेवटपर्यंत आपण साथ देणार असल्याचेही श्री. नैसर्गी यांनी सांगितले. तसेच थरमॅक्स चौक येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
या बंदमध्ये सहभागी असलेले महाराष्ट्र रिक्षा पंचायत निगडी विभागप्रमुख दीपक ताटे यांनाही पाठिंबा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि. देवेंद्रजी तायडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या संपूर्ण पाठिंब्यामध्ये वाहतूक शहर उपाध्यक्ष सुरज मसुरे, भोसरी विधानसभा सचिव वैजनाथ उबाळे, ईस्माईल मुकरताल, बालाजी सोनटक्के, अलीहुसेन पठाण, राजूभाई शेख, सादिक शेख, बाबासाहेब अहिरे आणि के. डी. वाघमारे यांचे सहकार्य लाभले.