पुसेसावळी:-पवार पब्लिक स्कूल अधिकृतच: अफवांवर विश्वास ठेवू नये:पवार.
प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
खटाव प्रतिनिधी-सौरभ चव्हाण
पवार पब्लिक स्कूल अधिकृतच: अफवांवर विश्वास ठेवू नये:पवार.
दिनांक 22 जानेवारी 2023 च्या दैनिक सकाळ दैनिक तरुण भारत तसेच ऑनलाईन माध्यमातून अधिकृत शाळांना नोटीस देण्याचे व कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभाग सातारा मार्फत करण्यात आले सदर बातमी मध्ये खटाव तालुक्यातील पुसेसावळी थोरेवाडी भागातील यशाची शिखरे पार करत असलेली पवार पब्लिक स्कूल पुसेसावळी थोरवेवाडी या शाळेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे तरी सदर शाळेविषयी कोणतीही ठोस माहिती न घेता वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली पवार पब्लिक स्कूल पुसेसावळी या शाळेत सन 2014 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाची इयत्ता पहिली ते पाचवी ची अधिकृत मान्यता मिळाली असून या शाळेचा यु डायस क्रमांक 27310404012 आहे ही मान्यता महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर व शासन निर्णय क्रमांक एस एफ एस 1014 /प्र.क्र. 208 / एस एम 2, 25 जून 2014 असा आहे. शाळेच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गांची दर्जा वाढ मान्यता प्रस्ताव 2019 साली शासनाकडे सर्व निकष व शर्ती सादर केलेला आहे त्यानुसार महाराष्ट्र शासन क्रीडा व शालेय शिक्षण विभाग यांच्याकडून संस्थेला दिनांक 28 मे 2022 रोजी इरादा पत्र मिळाले आहे व तालुकास्तरावरून शाळेची तपासणी होऊन भौतिक सोयी सुविधा गटशिक्षणाधिकारी यांचा अहवाल व शिफारस सर्व निकष पूर्ण असून सदर प्रस्ताव व अंतिम मान्यता शासन परिपत्रकाप्रमाणे शासन दरबारी अंतिम मान्यतेसाठी सादर केलेला आहे. तालुका जिल्हा तसेच राज्य पातळीवर शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीची परंपरा उल्लेखनीय आहे केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तसेच राज्य पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च जळगाव यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांची झालेली निवड कौतुकास्पद आहे क्रीडा क्षेत्रात जिल्हा परिषद शालेय शिक्षण ग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध शालेय स्पर्धांमध्ये शाळेचे विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. अल्पावधीतच पवार पब्लिक स्कूलने स्वतःच्या गुणवत्तेवर परिसरात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे सदर संस्था उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य करत असून पालकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. खेडूपाड्यातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकावा व तो स्व कर्तुत्वावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावा हा संस्थेचा उद्देश असून यासाठी संस्थाचालक सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक अपार मेहनत करतात. वर्तमानपत्रातून आलेली बातमी कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता व अपुऱ्या माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे त्यामुळे पालक शिक्षक व परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे पालकांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता शिक्षकांची शैक्षणिक पात्रता शिक्षकांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव व यशाची उज्वल परंपरा या सर्व बाबींची शहानिशा प्रत्यक्ष शाळेच्या ऑफिसमध्ये येऊन करावी कोणत्याही अफवांना बळी पडून नये अथवा विश्वास ठेवू नये असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री अनिल पवार सर व इतर सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी केलेले आहे.