वाई:-वडिलांचा सेवापुर्ती कार्यक्रम मुलाने केला अध्यात्मिक पद्धतीने साजरा.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वडिलांचा सेवापुर्ती कार्यक्रम मुलाने केला अध्यात्मिक पद्धतीने साजरा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग
वाई आगार येथे २५ वर्ष कार्यरत असलेले श्री.ह. भ. प अनिलकुमार संपतराव नावडकर वाहक क्र.5308 यांचा सेवापुर्ती कार्यक्रम गेले 25 ते 30 डिसेंबर असा 6 दिवस त्यांच्या घरी एक अनोखा उपक्रम म्हणून त्यांच्या मुलांने कु.ह.भ.प आशिष महाराज नावडकर (कीर्तनकार / गायक) यांनी श्री.ह.भ.प.सतिश महाराज खोमणे बारामती संयोगाने रामकथा चरित्र चिंतन ठेवले होते.
गेले सहाही दिवस कार्यक्रम खुप सुंदर पद्धतीने पार पडला व ज्या दिवशी वडिल सेवानिवृत्त होणार होते त्या दिवशी रामकथा व कृतज्ञता सोहळा सांगता कीर्तन
दि.31 चे नियोजन केले होते.यामध्ये ज्ञानेश्वरी कंठभूषण / गाथामूर्ती साधकहृदय श्रीगुरू ज्ञानेश्वर माऊली कदम ( मोठे माऊली) अध्यापक – स्वा. सु. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (आळंदी देवाची) यांचे किर्तन झाले.
*श्रीगुरु संतवीर युवकमित्र बंडा तात्या कराडकर* हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी ही आशिर्वाद दिले. प. पु. श्री ब्रह्मानंद महाराज सद्गुरू जंगली महाराज आश्रम अंबवडे,श्रीगुरु सुरेश महाराज सुळ
( अध्यापक: ज्ञानाई गुरुकुल अकलूज),श्री. संदीप सर जाधव
सातारा, श्रीगुरु सुंदर महाराज ठाकुर आळंदी,श्री. ह भ. प. कृष्णात महाराज तरडे सातारा हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सर्व वारकरी , साधक , भाविक , गुणीजन , सज्जन जवळपास 1000 लोक उपस्थित होते व कार्यक्रमासाठी 75 टाळकरी उपस्थित होते.
किर्तनामध्ये माऊलींनी असे सांगितले की आई-वडिलांचा विचार कोणताही मुलगा करीत नाही.आई-वडिलांचा महिमा वाढवावा असे सत्पुत्राला वाटते.आई म्हणजे साक्षात लक्ष्मी चे स्वरूप आहे.पिता म्हणजे नारायणाचे स्वरूप आहे.अशा भावनेतून त्यांच्या मुलाने ही सेवा केली आहे.
*आपुलिया हिता जो असे जागता ।*
*धन्य माता पिता तयाचिया ॥१॥*
*कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।*
*तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥*
शेवटी माऊलींनी आणि तात्यांनी त्यांचा वडिलांचा आणि आईंचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार देखील केला.