मावळ:-ठाकूरसाई गावातील ७ जणांना मिळाला प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
ठाकूरसाई गावातील ७ जणांना मिळाला प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ.
माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे यांच्या विशेष सहकार्याने ठाकूरसाई गावातील श्रीं शंकर ठाकर, श्री राजाराम ठाकर, श्री गणपत वाघमारे, श्री,विलास वाघमारे, श्री बबन ठाकर, उमेश कारके या प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी २.५ लाख इतक्या रकमेची मंजूरी मिळाली असून काम सुरू करण्याचा आदेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच निवृत्ती ठाकर, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रकाश ठाकर, माजी उपसरपंच विद्यमान ग्राम पंचायत सदस्य धर्मेंद्र ठाकर यांच्या हस्ते आदेशाचे वाटप करण्यात आले.
गेली अनेक वर्षे मातीच्या घरांमधे राहत होतो परंतु आता बाळा भाऊंच्या विशेष प्रयत्नाने आमचे सिमेंटच्या घराचे स्वप्न देखील पूर्ण होणार अशी भावुक प्रतिक्रिया शंकर ठाकर यांनी दिली. तर १९७२ साली पवणा धरण झाले. तिथला संसार मोडून आमचे पूर्वजांनी इथेच धरणाच्या कडेला वास्तव्य केले खरे ! पण उपजीविकेसाठी मोलमजुरी शिवाय काहीच पर्याय नसल्याने कुड़ा मातीच्या घराला सुधारण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जमवणे अवघड होते. परंतु यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे यांनी आमची गरिबांची व्यथा ऐकली आणि आम्हाला घरकूल मिळवून दिल्याबद्दल यांचे विशेष आभार असे मत राजाराम ठाकर यांच्या मुलांनी व्यक्त केले.