पुणे पिंपरी:-प्रदीर्घ आजाराच्या लढतीनंतर शेवटी आमदार लक्ष्मण जगताप यांनी जगाला दिला अखेरचा निरोप.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रदीर्घ आजाराच्या लढतीनंतर शेवटी
आमदार लक्ष्मण जगताप यांनी जगाला दिला अखेरचा निरोप
पिंपरी, दि. 3 (शफिक शेख):- मागील अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देत असलेल्या भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्राणज्योत अखेर आज सकाळी बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे मालवली. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या ऐश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप, असा मोठा परिवार आहे. अंत्यदर्शन आज दुपारी ३ ते ६ या वेळेत त्यांचे निवासस्थान चंद्ररंग, पिंपळे गुरव येथे आहे. अंत्यविधी आज दि. ३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता पिंपळे गुरव येथे होणार आहे.
आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. शहराच्या राजकारणातील ढाण्या वाघ गेल्याची भावना व्यक्त होत आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली.
शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले. आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. आता जगताप यांच्यासारखा मोठा आधारस्तंभ निखळल्याने भाजपाला पोरकेपण आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.