ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्या वतीने विविध भागात जाहीर निषेध.

प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मौजे पुसेसावळी ता.खटाव व मसूर ता. कराड येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ कराड-उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कराड -उत्तर भाजपाचे नेते,वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन श्री.धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो अशा धर्मवीर छ. संभाजी महाराजांना अजित पवार म्हणतात कि, छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. छ. संभाजी महाराजांनी आपल्या देहाची हाल अपेष्टा सहन केली. पण धर्म बदलला नाही.धर्मवीर छ. संभाजी महाराजांना धर्मवीर हे कोणत्या नेत्याने म्हंटले नाही, तर हिंदुस्थानातील तमाम विद्वानांनी छ. संभाजी महाराजांना धर्मवीर असे म्हंटलं आहे. ज्या छ. संभाजी महाराजांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रा पार नेले. अशा छ. संभाजी महाराज यांच्या विरुद्ध बोलून छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे, म्हणणाऱ्या अजित पवारचा धिक्कार असो असे सांगत निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव काका पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, अमोल कदम नितीन वीर, श्रीकांत पिसाळ, ज्ञानेश्वर पवार, दिपाली ताई खोत, नवीन जगदाळे, बिपिन जगदाळे, विकी पाटील, अनिल पवार, कृष्णात यादव, अरुण घाडगे, शिवनाथ यादव, कालिदास यादव, बाबू पवार, प्रेम वाईकर, बापूराव कदम, नाना जाधव, सतीश पिसाळ, प्रशांत पिसाळ, मछिंद्र पिसाळ, धनाजी पिसाळ, सुधाकर पिसाळ,दत्ता साळुंखे, सतीश माळी, जयवंत जगदाळे, संदीप पवार, सुनील दळवी, शंकर शेजवळ, शहाजी मोहिते, रुक्मिणी जाधव, शितल कुलकर्णी, संदीप चव्हाण, राजेंद्र चव्हाण, बाबुराव चौधरी, पिंटू मोरे, अक्षय चव्हाण व शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button