क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या – अजित गव्हाणे.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा
निर्णय ताबडतोब मागे घ्या – अजित गव्हाणे
पिंपरी, दि. 27 (शफिक शेख) :- पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या, अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला.
देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच या कपंनीशी संबंधीत आजी- माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत, असेही गव्हाणे यांनी निदर्शनास आणून दिले. शहरातील जनतेनेही या विषयावर रस्त्यावर उतरावे आणि आपले शहर या गुन्हेगारांपासून वाचवावे असे आवाहन श्री. गव्हाणे यांनी केले आहे.
स्मार्ट सिटी समिती व्यवस्थापनाने शुक्रवारच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध डावलून या विषयावर निर्णय घेतला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आयुक्त शेखर सिंह यांना भेटले असता, चौकशी करून पुढील निर्णय करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही एका बड्या नेत्यांच्या दबावाखाली तो विषय मंजूर केल्याने नागरिकांमध्येही संतप्त प्रतिक्रीया आहे.
मे. सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेड – मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या भागीदार कंपनीने निविदा भरली आहे. त्यातील रियाझ शेख आणि ड्वेन परेरा यांच्यावर अहमदाबाद येथे बनावट टेलिफोन एक्सचेंज चालविण्याच्या प्रकऱणात गुन्हा दाखल आहे. शहरातील एक बडा नेता आणि महापालिका प्रशासनाचाही त्यासाठी बराच आग्रह असल्याने संशय बळावला आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांच्या हातात शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविले तर आगामी काळात खूप मोठा धोका संभवतो, असेही गव्हाणे म्हणाले.
शहराला नेमका धोका असा आहे –
केबल इंटरनेटचे नेटवर्क अशा गुन्हेगारांकडे गेले तर, उद्या डेटा चोरी होऊ शकते. दुबई किंवा पाकिस्तानातून खंडणी उकळण्यासाठी गुन्हेगारांनी फोन केला तरी ते सापडणार नाही. महिला आणि मुलिंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जातीय तेढ निर्माण कऱण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाऊ शकते इतकेच नाही तर अतिरेकी कारवायासुध्दा होऊ शकतात. शहरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल डक्ट तयार कऱण्यात आले. तत्कालिन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी महापालिकेसाठी नवीन उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता. महापालिकेला त्यातून भरघोस उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अंडरग्राऊंड केबलसाठी विविध कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईलाही आळा बसणार आहे. डक्ट भाडेपट्ट्याने देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची एक निविदा नुकतीच काढली होती.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button