ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-शिवसेनेच्या लेटर पॅड वर फडणवीस यांची छबी….

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

शिवसेनेच्या लेटर पॅड वर फडणवीस यांची छबी….
सातारा दि:. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची सहा महिन्यापूर्वी दोन शकले झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे सातारा जिल्ह्यातील एका विभाग प्रमुखाने आपल्या लेटर पॅड वर चक्क भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी छापल्यामुळे तो एक चर्चेचा विषय झालेला आहे.
दुष्काळी भागाला पिण्याचे पाणी देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीला पाणी देण्यासाठी पहिली कुदळ मारली होती. आज त्याच दुष्काळी भागातील शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाकडे धाव घेतलेले सातारा जिल्ह्यातील पळसगाव ता. खटाव येथील जिल्हा परिषद निमसोड व औंध गट विभाग प्रमुख श्री. हणमंत घाडगे यांनी आपल्या लेटर पॅड वर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्य मंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी लेटर पॅड वर छापून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
श्री. घाडगे हे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणुन या परिसरात प्रसिद्ध आहेत. गेले चाळीस वर्षे ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते परंतु त्यांची फारशी दखल शिवसेनेने घेतली नाही त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेचे बोलले जात आहे. श्री घाडगे हे शेतकरी कुटुंबातील असून साधी राहणी व नम्रता असणारे ग्रामीण भागातील चेहरा आहे. शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी त्यांना शिंदे गटात प्रवेश देवून त्यांच्यावर विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.
खटाव तालुक्यातील ग्रामीण भागात शिंदे गटाची शिवसेना पोहचवण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत त्यांच्या लेटर पॅड वर शेवसेनेचे नेते यांची छबी ठीक आहे परंतु, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाच्या राजकीय प्रवासाचे शेवटचे स्टेशन हे भाजप तर नव्हे ना? अशी शंका आता राजकीय विरोधक विनोदाने करू लागले आहेत. त्यामुळे श्री हणमंत घाडगे यांचे लेटर पॅड संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.
—————————–
फोटो – सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या लेटर पॅड भाजप नेत्याची छबी. छाया – अजित जगताप सातारा

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button