ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी जत्रेस भेट.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी जत्रेस भेट.
पिंपरी, दि. 19 (शफिक शेख) :-. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा. त्या दृष्टीने समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अति. आयुक्त उल्हास जगताप, मा. महापौर माई ढोरे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, किरण गायकवाड, सुहास बहाद्दरपुरे, एकनाथ पवार, नामदेव ढाके, शंकर जगताप, सुरेश भोईर, सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, अभिषेक बारणे, शत्रुघ्न काटे, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, विनायक गायकवाड, माधवी राजापुरे, उषा मुंडे, शारदा सोनवणे यांच्यासह महिला बचत गटाचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
जत्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पवनाथडी जत्रेत एकूण ४०० इतकी स्टॉल आहेत, तर सुमारे ७०० बचगटांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे स्टॉल यात्रेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी पवनाथडीतील महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन तेथील काही वस्तू देखील खरेदी केल्या.
काचेच्या फेसमास्कसह चंद्रकांत पाटील….
सदर भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य ‘आजारा’चे धोके टाळण्यासाठी प्लॅस्टिकचा फेसमास्क परिधान केला. गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड परिसरात वाढणा-या ‘स्वास्थ्य’विषयक आजारांचे प्रमाण वाढल्याने पाटील यांनी सावधानता बाळगली आणि संपूर्ण चेह-यावर मास्क परिधान केले. त्यांच्या या आरोग्याबाबतच्या सूचकतेचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button