पुणे- निगडी:-ज्ञानदीप विद्यामंदीर या प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
ज्ञानदीप विद्यामंदीर या प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.
निगडी, दि. 3 (शफिक शेख):- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विद्यामंदीर या प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त 20 हून अधिकार 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या थोर महापुरूषांचा जीवनपट उलगडून सांगितला. तसेच शिक्षक पालकसंघाचे उपाध्यक्ष श्री. सतीश परदेशी यांनी शेतकर-यांची आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न लहान मुलांच्या मूक पथनाटयातून सादर प्रेक्षकांसमोर मांडला.
यावेळी मान्यवर रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री. दशरथ जगताप, श्री. सोपनाराव फडके, श्री. मंगेश नेरकर, श्री. रमेश भालेकर, पत्रकार शफिक शेख, सौ. बाटले मॅडम यांच्या हस्ते क्रांतीदिन व गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ज्येष्ठ शिक्षक श्री. कदम सर, प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. नवले मॅडम, आभार श्री. देवरे सर यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सोनवणे मॅडम व शिक्षक वृंदानी केले.