सातारा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळा निमित्त सत्कार….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळा निमित्त सत्कार….
सातारा दि:
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय म्हणजे गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारी वास्तू आहे. या ठिकाणी सातारा जिल्हा शिल्लक चिकित्सक म्हणून डॉक्टर युवराज करपे यांनी यशस्वीरीत्या दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
दि. २० जुलै २०२३ रोजी सातारचे भूमिपुत्र असलेल्या डॉ. युवराज करपे यांनी स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे जिल्हा शिल्लक चिकित्सक म्हणून पदभार स्वीकारला. अनंत अडचणीवर बात करून रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी त्यांनी यशस्वीरित्या दोन वर्ष पूर्ण केले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला . यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे महाराष्ट्र सदस्य संजय नितनवरे यांनी म्हटले की, या दोन वर्षात डॉ. युवराज करपे यांनी खूप निष्ठेने आणि प्रामाणिकपणे या रुग्णालयाची सेवा केली .आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले . कर्मचारी अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ व कार्यालयीन कर्मचारी साक्षीदार आहोत. खरे तर अनेक जिल्हा शिल्लक चिकित्सक या पदावर होऊन गेले परंतु डॉ.युवराज करपे कुटुंबप्रमुख सारखे वाटले. त्यांनी कधीही कर्मचाऱ्यांवर बॉसगिरी गेली नाही. जबाबदारीत कुचराई झाली तर त्यांनी योग्य अत्यंत कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांची कान उघडणे केली. मात्र, त्यामध्ये कधी व्यक्तिगत द्वेष भाव कधीच केला नाही. रुग्णालयीन कर्मचारी म्हणजे एक कुटुंब असल्याच्या भावनेने डॉ. युवराज करपे यांनी सर्वांना सोबत घेतले. जिथे आरोग्य यंत्रणेवर आरोप होतील. तिथे लगेचच कर्मचाऱ्यांना बोलावून सूचना देत आहेत. विशेष म्हणजे या सूचना देताना घरातील जबाबदारी आहे. आणि ती प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडायला हवी असा त्यांचा सुर होता .
आज सातारा जिल्हा चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या योगदानामुळे जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सुधारणा करत आहे. याचे श्रेय डॉ. युवराज करपे यांना आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयातील जन्म मृत्यू उपनिबंधक अधिकारी व्यंकटेश गौर, संजय नितनवरे, सुप्रिया भोकरे, वैष्णवी ढाणक, पूजा फाळके, मोनिका कीर्तीकुडाव, रसिका गायकवाड यांनी डॉ. युवराज करपे यांना दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णालयीन कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ उपस्थित होते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
—— ——- ——– ——- —-