शिवम् प्रतिष्ठान कराडचे युवाहृदय संमेलन उत्साहात पारपडले
प्रतिनिधि:- विनोद पाटील

*सदविचार…! सहजीवन…! संघटन…! संजीवन…!*
शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित शिवम बलशाली युवा हृदय संमेलन २०२२ नुकतेच यशस्वीरीत्या घारेवाडी (कराड) येथे संपन्न झाले.*सनदी अधिकारी मा.श्री.इंद्रजीत देशमुख साहेब (काकाजी)* यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या बलशाही युवा हृदय संमेलनाचे सलग २१ वे वर्ष यशस्वीरीत्या पार पडले.
१५,१६,१७ एप्रिल २०२२ असे सलग तीन दिवस सुरू असलेल्या संमेलनाचा आज समारोप झाला.
देशातील नामवंत,ख्यातनाम, आभ्यासू व्यक्तिमत्व वक्ते म्हणून प्रमुख पाहुणे होते या कार्यक्रमाचे.साधारणपणे २००० ते ३००० मुलं,मुली,ज्येष्ठ नागरिक,अबालवृद्ध,बालचमू उपस्थित होते या कार्यक्रमाला.
शिवम बलशाही युवा हृदय संमेलनाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शिस्त,नियोजन बद्द कार्यक्रम,वक्तशीरपणा,मान सन्मान,आपुलकी,प्रेम,उद्याचा बलशाली नवभारत घडविण्याची जिद्द,ज्ञानाचा भांडार,आत्मीयता या सगळ्यांचा सुरेख संगम म्हणजे घारेवाडीचा धुळोबा डोंगर.
२१ वर्षांपूर्वी आदरणीय *मा.श्री.इंद्रजीत देशमुख साहेब उर्फ काकाजी* यांनी एक छोटंसं रोपटे लावले त्याचा आज विशाल वटवृक्ष झाला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.आपल्या प्रशासकीय सेवेतील नोकरीचा राजीनामा देऊन आपण समाजातील अपेक्षित,उपेक्षित,दुर्बल,
सर्वसामान्य लोकांना चांगल्या मार्गाने जीवन कसे जगायचे,स्वतः मध्ये अमुलाग्र बदल कसे घडवायचे,आपल्याबरोबर आपल्या समाजाला कसे पुढे घेवून जाता येईल याचा आदर्श वास्तुपाठच साहेब आपण घालून दिलात.
*काकाजी* आपल्याच मार्गदर्शनाखाली आज आपल्या *शिवम प्रतिष्ठान* चे असंख्य युवक,युवती आज महाराष्ट्रासह देशात प्रशासकीय,राजकीय,सामाजिक,कला,क्रीडा,
व्यापार,उद्योग,
शिक्षण,विधी व न्याय,आरोग्य,कृषी,जलसंधारण अशा विविध स्तरावर आपल्या कार्यकुशल कर्तृत्वाच्या जोरावर समाजाची सेवा बजावत आहेत.बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
आज हजारोंच्या उपस्थित होणारे कार्यक्रम नक्कीच एक दिवस लाखोंच्या घरात पोहोचतील आणि बलशाली भारताची ही पताका सबंध देशभर पसरून निच्चीत एक चांगले परिवर्तन होईल. हा विश्वास *काकाजींच्या* व *शिवम प्रतिष्ठान* वरती निस्सीम प्रेम करणाऱ्या
शिबिरारर्थिंच्या मनात नक्कीच आहे.
*शिवम प्रतिष्ठान घारेवाडी (कराड) तर्फे विविध कार्यक्रम व उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात.ते खालीलप्रमाणे.*
१.बलशाली युवा हृदय संमेलन
२.शौर्यवर्धिनी सखी हृदय संमेलन
३.शेतकरी हृदय संमेलन
४.सावली वृद्धाश्रम
५.गुरुजन हृदय संमेलन
६. मायभू सेवा यात्रा
७.पथनाट्य शिबीर
८.निसर्गोपचार केंद्र
९.गुरुपौर्णिमा उत्सव
१०.पालक संजीवनी शिबीर
११. बाल संस्कार व सैनिकी प्रशिक्षण शिबीर
१२.स्पर्धा परीक्षा केंद्र व आभ्यासिका.
त्याचबरोबर *पार्ले तालुका – कराड गावचे सुपुत्र,मा.आदर्श सरपंच,प्रगतशील बागायतदार, व शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान*
*घारेवाडी (कराड) चे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.राहुलकुमार अशोकराव पाटील पार्लेकर* यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.आदरणीय *काकाजींच्या* बरोबर खांद्याला खांदा लावून आपल्या सर्वच टीम च्या साथीने आपली *अध्यक्ष* पदाची धुरा एक *स्वयंसेवक* म्हणून अतिशय उत्तम रित्या यशस्वीपणे सांभाळत आहेत.
संघटन कौशल्य,बुद्धीचातुर्य व निर्णय क्षमता याचा त्रिवेणी संगम म्हणजे *राहुल दादा.*
एक सामान्य व्यक्ती म्हणून आपल्या बद्दल वाटणारा अभिमान,आदर,प्रेम,कौतुक समस्थ *पार्लेकरांना* कायमच भावते.विचार,आचार,कृती,
निर्णय क्षमता या मधील सुसंगता कशी असते याचे प्रत्यंतर *राहुल दादा* तुमच्याकडे पाहताना येते.तुमच्या बरोबर काम करताना ते आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत, अनुभवत आहोत.
राजकारण व समाजकारणात आपण दिलेली झुंज पाहताना आमच्या मनात उत्साहाचे वारं भरते,मनगटात बळ येते.सामाजिक कार्य,जात – धर्म यापलीकडे जाऊन निर्भयतेने करण्याचा आदर्श वास्तुपाठ *राहुल दादा* आपण आम्हाला दिलात.आपण एक कुटुंब वत्सल्य पुत्र, पती, पिता , एक प्रगतशील शेतकरी या भूमिका पार पाडताना अविरत व्यक्ती म्हणून आपल्याला पाहतो.
आपला साधेपणा, समतोल विचार, ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य याचं आम्हाला कौतुक वाटतं.प्रतिकुलतेतही काम पुढे न्यायचे हा आपला बाणा *शिवम प्रतिष्ठान* चा प्रत्येक स्वयंसेवक जपत राहील.अभ्यास, निरिक्षण, समतोल विचार व कृती ही आपली शिकवन ध्यानात ठेवून *शिवम प्रतिष्ठान* ची पुढील वाटचाल आदरणीय *काकाजींच्या* मार्गदर्शनाखाली व *राहुल दादा* आपल्या नेतृत्वात स्वप्न बलशाली भारताचे पूर्ण करण्यासाठी अखंडित पणे पुढे घेवून जाऊ हा विश्वास वाटतो.
*शुभेच्छुक – सह्याद्री ग्रामविकास पॅनेल व समस्थ पार्ले ग्रामस्थ.*