ताज्या घडामोडी

सातारा:-विद्यार्थी व पालकांसाठी साताऱ्यातील डी.जी.महाविद्यालयात बजेट सत्र संपन्न.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

विद्यार्थी व पालकांसाठी साताऱ्यातील डी.जी. महाविद्यालयात बजेट सत्र संपन्न.


सातारा दि: सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ या विषयावर चर्चा संपन्न झाली. या विषयावर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.
अंदाजपत्रकातील निर्णयांचे भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर व जनसामान्यावर काय परिणाम होतील? याविषयी शिक्षक, विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले. चार्टर्ड अकाउंटंट विजयकुमार क्षीरसागर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस बजेट विषयी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी शासनाच्या उत्पन्नाचे विविध मार्ग व आयकर त्याचे जनसामान्यांवर होणारे परिणाम याविषयी भाष्य केले. नंतर झालेल्या चर्चेत कृषी क्षेत्रातील प्रकल्प अधिकारी अजित शेंडे यांनी अंदाजपत्रकाचे कृषी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकले. तसेच अंदाजपत्रकातील तरतुदींमुळे येणाऱ्या काळात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याविषयी गुंतवणूक तज्ञ शंकरा करपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शासनाच्या विविध उपक्रमांवर अंदाजपत्रकाचे परिणाम कसे होणार आहेत? व लोकांचा सहभाग उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेल्याचे मत जिल्हा सांख्यिकी अधिकारी अपर्णा गुरव यांनी व्यक्त केले. अंदाज पत्रकाचे जनसामान्यांवर कसे परिणाम होतील? व सामाजिक कल्याणासाठी शासनाने अंदाजपत्रकात कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत? याविषयी वृत्तपत्र पत्रकार अजित जगताप यांनी प्रकाश टाकले.
कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हसके व प्र.कुलसचिव डॉ. विजय कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जाधव, उपप्राचार्य डॉ. टी. डी. महानवर कॉमर्स विभागाचे प्राध्यापक मन्सूर शिकलगार तसेच व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. राजशेखर निलोलू यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी ढाणे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्रीकांत गंगावणे यांनी मानले. या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी यांनी अर्थसंकल्प समजून घेतला तसेच आपल्या मनातील शंका उपस्थित करून त्याचे निरसन केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

————–
फोटो -डी.जे. महाविद्यालयात अर्थसंकल्प बाबत चर्चासत्रात मार्गदर्शन करताना मान्यवर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button