वाई:-किसन वीर च्या विद्यार्थिनीचे शिवाजी विद्यापीठ विभागीय तायक्वांदो स्पर्धेत उज्ज्वल यश.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
किसन वीर च्या विद्यार्थिनीचे शिवाजी विद्यापीठ विभागीय तायक्वांदो स्पर्धेत उज्ज्वल यश.
वाई: सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय तायक्वांदो स्पर्धेत किसन वीर महाविद्यालयाच्या कु. श्वेता धनवडे हिने ४९ किलो वजन गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवला. व तिची बाळासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे होणा-या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, तिन्हीं शाखांचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे व समीर पवार, मनोज शिंदे व गजानन जाधव यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.