पुणे चिंचवड:-दरोडा आणि गुंडाविरोधी पथकाची धडक कारवाई 4 तासांत गोळीबार करणा-यांना अटक.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दरोडा आणि गुंडाविरोधी पथकाची धडक कारवाई
4 तासांत गोळीबार करणा-यांना अटक.
चिंचवड, दि. 07 (शफिक शेख):- पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड आणि लिंकरोड भाटनगर व बौद्धनगर या परिसरांत हवेत गोळीबार करून दहशत माजविल्याप्रकरणी आणि चिंचवड येथील किराणा स्टोअर चालकास शिवीगाळ करून मारहाण करणा-या तीन इसमांना पिंपरी दरोडाविरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने 4 तासांत अटक केली, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. शाहरूख शेख (वय 29, दापोडी), शोएब अल्वी, फारूख शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 6/12/2022 रोजी सायंकाळी पत्राशेड झोपडपट्टी, रेल्वे लाईनजवळ, लिंकरोड, चिंचवड येथे एका रिक्षामधून आलेल्या तीन इसमांनी हवेत फायरिंग केलेबाबत माहिती गुन्हे नियंत्रण कक्षाला मिळताच सदर आरोपींपैकी शाहरूख शेख यास दापोडी येथून ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे इतर साथीदार शोएब अल्वी, मायकल आणि फारूख शेख यास गुंडा विरोधी पथकाने दापोडी येथून ताब्यात घेतले.
सदर कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉत्र संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त गुन्हे स्वप्ना मोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे प्रशात अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदस इंगवले, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. काटकर, युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नांदुरकर, युनिट 3 चे वपोनि श्री. गायकवाड तसेच गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक हरिष माने व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी कारवाई केली.