श्रीरामपूर:-उंदीरगाव येथे मराठा समाज प्रमाणपत्रासाठी 14 गावातील 103 नागरिकांनी केली नोंदणी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
उंदीरगाव येथे मराठा समाज प्रमाणपत्रासाठी 14 गावातील 103 नागरिकांनी केली नोंदणी.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) तालुक्यातील उंदिरगाव मंडळातील मराठा समाज मराठा कुणबी पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र निगीमित करण्यासाठी नोंदणी प्रक्रियेसाती सकाळी 9 वाजेपासुन उंदिरगाव येथे नागरिकांनी गर्दी केली होती दिवसभरात निमगाव,खैरी दिघी गोंडेगाव, नाऊर रामपुर जाफ्राबाद नायगाव, मातुलठान, सरला गोवर्धनपुर, महांकाळवाडगाव, माळेवाडी,उंदिरगाव,हरिगाव, वा 14 गावातील 103 नागरिकांनी नोंदणी केली असल्याचे तलाठी कुणाल काळे यांनी सांगितले . उंदिरगाव नंतर गोवर्धन आदी गावात शिबीर घेण्यात आले . प्रांताधिकारी किरण सावंत पाटील . तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून ऑनलाईन नोंदणी करताना दिसत होते त्यासाठी लाभार्थी व त्यांच्या कुटुंबातील
वंशावळ शाळा सोडल्याचा दाखला वडील . चुलत्याचा . भावाचा शाळा सोडल्याचा दाखला . ओळखपत्र कुणबी जातीबाबतचा जन्म मृत्यू नोंद . उतारा आदी पुरावा . मोडी लिपीत असल्यास वाचकाचे प्रतिज्ञापत्र . वंशावळ स्पष्ट होणारे फेरफार सातबारा उतारा . कडई पत्रक . खरेदी खते . रेशन कार्ड तसेच कोणताही शासकीय पुरावा आदी कागदपत्र आवश्यक आहेत नोंदणी झाल्यावर प्रमाणपत्र सात दिवसांनी संबंधितांना मिळणार असल्याचे शासकीय अधिकारी यांनी सांगितले यावेळी नोंदणीसाठी शासनाचे उंदिरगाव मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ तसाठी कुणाल काळे . तलाठी अविनाश तेलतुंबडे तलाठी अविनाश संतोष चव्हाण . कोतवाल संदीप नवसरे . गणेश बिरदवडे हे शिबिरात कार्यरत होते प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रियेच्यावेळी सकाळी येथील माजी चेअरमन सुरेश गलांडे,कृषी उत्पत्र बाजार समिती संचालक राजेंद्र पाऊलबुद्वे,अशोक कारखाना संचालक विरेश गलांडे,राजेंद्र नाईक, जितेंद्र गोलवड,बाळासाहेब नाईक, सोपानराव नाईक, अशोक गलांडे आदी उपस्थित होते.