कराड:- आदर्शमाता प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
आदर्शमाता प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाडळी( केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने पाडळी( केसे)येथील दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिव्यांग बांधवांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पाडळी केस येथील मंजूर शौकत फरास यांचा आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संपतराव मोहिते, मार्गदर्शक दिलीप महाजन, आनंदराव बडेकर, फिरोज मुल्ला, अरबाज नूरमहंमद मुल्ला, सचिन मोहन अवघडे सहकारी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी अशीच दिवसेंदिवस भरभराटीची होत जावो. असे समाधान व्यक्त करून प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.