श्रीरामपूर:-बाळाला आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांचे डोळे पाणावले – रांजणाव MIDC पोलीसांच्या हृदयस्पर्शी कामगिरी ……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
बाळाला आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांचे डोळे पाणावले – रांजणाव MIDC पोलीसांच्या हृदयस्पर्शी कामगिरी ……

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) मानवतेचे दर्शन घडवणारी घटना रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात घडली . तीन वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या सुखरूप ताब्यात देताना पोलिसांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
रिक्षाचालक सद्दाम अकबर खान ( रा शिरूर जि पुणे ) हे दुपारी सुमारे १.३० वाजता रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये आले. त्यांनी पोलिसांना सांगितले की हा लहान मुलगा मला कारेगाव गावच्या हद्दीतील पुणे रोडलगत हॉटेल पाटिलवाडा येथे एकटाच भटकताना आढळला तो काही बोलू शकत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांचा शोध घ्यावा असे सांगून त्यांनी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही माहिती पोलिस अंमलदार पो . हवा वैजनाथ नागरगोजे यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांनी दिली .त्याचा मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करून मुलाचे आई – वडील शोधण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले . पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करून मुलाचा व्हिडिओ प्रसारित केले आणि नागरिकांना उपयुक्त माहिती देण्याचे आवाहन केले या जनजागृतीला यश मिळाले.
सायंकाळी सुमारे ६ वाजता दिव्य भारती राम खिलारी ( रा .कारेगाव ता शिरूर जि पुणे ) या महिला पोलिस स्टेशनमध्ये आल्या आणि ” हा माझा मुलगा आहे – मटरू राम खिलारी . वय 3 वर्षे ” असे सांगितले त्यांनी सांगितले ” मी कामानिमित्त घराबाहेर गेले होते .तो घरातून बाहेर पडला आणि हरवला . मी सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नाही. सायंकाळी शेजारीणबाईने रांणणगाव पोलिसांनी बनवलेला सोशल मीडियावरील व्हिडीओ दाखवला तेव्हा मी धावत पोलीस स्टेशनकडे आले.
पोलिसांनी योग्य पडताळणी करून लहान महरुला आईच्या ताब्यात सुखरूप दिले त्या क्षणी उपास्थितांचे डोळे पाणावले रांजनागाव MIDC पोलिस ठाण्यातच्या महिला अंमलदारांनी त्या चिमुकल्याला चॉकलेट खेळणी देत मायेने शांत केले इतका जीव लावल्यामुळे तो आईकडे जायला तयार नव्हता. पण अखेर आईच्या कुशीत झेपावताच सर्वांच्या नजरा झोलावल्या
ही संपूर्ण हृदययस्पर्शी आणि आदर्शवत कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. वैजनाथ नागरगोजे, पो कॉ,आकाश सवाने, पो.कॉ संदीप भांड,योगेश गुंड तसेच महिला अंमलदार शीतल रोंधळ आणि पुजा नाणेकर यांनी केली.
रांजणगाव MIDC पोलिसांच्या या तत्परतेमुळे एक आई आणि मुलाचे आयुष्य पुन्हा उजळले … आणि समाजसमोर पुन्हा एकदा मानवतेपेक्षा मोठं काही नाही हा संदेश जिवंत आहे.




