पुणे पिंपरी:-रोजगार मेळाव्यात अकराशेपेक्षा जास्त जणांना ऑन द स्पॉट नोकरी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
रोजगार मेळाव्यात अकराशेपेक्षा जास्त जणांना ऑन द स्पॉट नोकरी.
पिंपरी, दि. 5 (शफिक शेख):- भाजप आमदार लक्ष्मण जगताप, प्रतिभा महिला प्रतिष्ठान तसेच कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यात अकराशेपेक्षा जास्त जणांना “ऑन द स्पॉट” नोकरी मिळाली. शंकर जगताप यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून ५१ दिव्यांगांना नोकरी उपलब्ध झाली.
यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, उपायुक्त अनुपमा पवार, सहा. आयुक्त सागर मोहिते, मा. महापौर नानी घुले, नामदेव ढाके, एकनाथ पवार, राजेंद्र राजापुरे, विलास मडिगेरी, सदाशिव खाडे, सविता खुळे, अश्विनी चिंचवडे, उषा मुंढे, माधवी राजापुरे, आरती चोंधे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, संगीता भोंडवे, मनिषा पवार, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सांगर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाळासाहेब ओव्हाळ, संदिप कस्पटे, विनायक गायकवाड, अभिषेक बारणे, महेश जगताप, विभीषण चौधरी, संदीप गाडे, गोपाळ माळेकर, उज्ज्वला गावडे, अमित गोरखे, अनुप मोरे, प्रमोद ताम्हणकर, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, माऊली जगताप, शेखर चिंचवडे, डॉ. गणेश अंबिके आदी उपस्थित होते.
५१ नामांकित कंपन्या व उद्योजकांचा सहभाग
या मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ५१ नामांकित कंपन्या व उद्योजकांनी सहभाग घेतला. प्रत्येक कंपनीच्या स्टॉलवर संबंधित अधिकाऱ्यांनी थेट मुलाखती घेऊन कागदपत्रे तपासल्यानंतर पात्रतेनुसार नियुक्तीपत्रे बहाल केली. यामध्ये आठवी पास झालेल्यांपासून ते डिप्लोमा, डिग्री केलेल्या बेरोजगारांना नोकरी मिळाली.
बेरोजगार दिव्यांगानाही मिळाली नोकरी
मेळाव्यात रोजगार मिळावा म्हणून नोंदणी केलेल्या 84 दिव्यांगांपैकी 51 दिव्यांगांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र
या मेळाव्यात बोलताना शंकर जगताप यांनी बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्ये विकसित करून समाज व राज्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याच सांगितले.