क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-पिंपरी-परशुराम चौकातील खून करणा-या टोळीस 12 तासांत जेरबंद करण्यात पिंपरी पोलिसांना यश.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

परशुराम चौकातील खून करणा-या टोळीस 12 तासांत
जेरबंद करण्यात पिंपरी पोलिसांना यश.
पिंपरी, दि. 04 (शफिक शेख):- रामनगर चिंचवड येथील परशुराम चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच व्यावसायिक वादातून कट रचून गावठी कट्टा आणि धारदार शस्त्राने विशाल गायकवाड या तरूणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी 12 तासांच्या आत 7 पुरूष, 1 महिला आणि 2 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. त्याबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये पिंपरी पोलिसांचे आभार व्यक्त केले जात आहे. याबाबत मयत विशाल गायकवाड याचा भाउ अर्जुन नागु गायकवाड याने फिर्याद दिली असून भोजराज मिसाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे पुढील तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अष्टविनायक चौक, मोरे वस्ती चिखली येथे कुटुंबासह वास्तव्यास असणा-या विशाल गायकवाड याचे परशुराम चौक येथे वॉशिंग सेंटर आहे. दिनांक 3/12/2022 रोजी सायंकाळी 6.15 च्या सुमारास 15 ते 16 जणांच्या टोळीने विशाल गायकवाड याच्यावर कोयता आणि धारदार शस्त्राने हल्ला चढविला आणि गावठी कट्टयातून हवेत गोळीबार करीत परिसरात दहशत माजविली. त्यामध्ये विशाल गायकवाड हा गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर ते सर्व पळून गेले. विशालचा भाउ अर्जुन हा परत आल्यानंतर त्याने त्वरित भावास इतरांच्या मदतीने हॉस्पिटलला पोहोचविले तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
पोलिस निरीक्षक श्री. मिसाळ यांनी भादवि कलम 302, 143, 147, 148, 149, आर्म अॅक्ट कलम 3,4,25,27 प्रमाणे आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून काहीएक पुरावा उपलब्ध नसताना पिंपरी-चिंचवड येथील 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याच्या विश्लेषणाद्वारे वरील आरोपींना अटक केली.
सदर गुन्हयाचा तपास मा. अंकुश शिंदे पो.आयुक्त, डॉ. संजय शिंदे अ.पो.आयुक्त, विवेक पाटील पो. उपायुक्त, श्रीमती प्रेरणा कट्टे सहा.पो.आयुक्त, शंकर अवताडे व.पो.नि. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. भोजराज मिसाळ यांनी आतापर्यंतची ही कार्यवाही करून पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button