आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-क्रांतिज्योती प्रतिनिधीक काव्यसंग्रहास स्वदेशी भारत पुरस्कार समारंभ संपन्न.

प्रतिनिधी कासम मुलाणी:-9892191925

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

प्रतिनिधी कासम मुलाणी.

क्रांतिज्योती प्रतिनिधीक काव्यसंग्रहास स्वदेशी भारत पुरस्कार समारंभ संपन्न.

———————————-
:दिनांक 30/11/2022 रोजी श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण व स्वदेशी बचत गट आसू यांच्या वतीने हुतात्मा राष्ट्रबंधु राजीव दीक्षित यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते.प्रमुख पाहुणे शशिकांत सोनवलकर संचालक प्राथमिक शिक्षक बँक , जीवन इंगळे सर्वोदय कार्यकर्ते , कवी हनुमंत चांदगुडे, प्रमोद झांबरे, महादेव सकुंडे सरपंच आसू , साहित्यिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शतकोत्तर रौप्यस्मृती वर्षानिमित्ताने सावित्रीबाई फुले या विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करून एकशे दहा कवितांचा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगाव येथे प्रकाशित करण्यात आला.या काव्यसंग्रहाचे संपादन सौ रोहिणी रासकर , अजित जाधव व ज तु गार्डे यांनी केले. क्रांतिज्योती प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन करीता सुजन फौंडेशन व सावित्रीबाई फुले शैक्षणिक व समाजिक संस्था फलटण यांचे सहकार्य लाभले.
स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार हा काव्यसंग्रह निर्मिती प्रक्रियेतील सर्वानांचा सन्मान असल्याचे अजित जाधव यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी ताराचंद आवळे यांनी केले.उपस्थित मान्यवर व साहित्यिक यांचे आभार प्रकाश सकुंडे यांनी मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button