ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-मायणी ग्रामपंचायत 18 रोजी प्रत्यक्ष मतदान.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मायणी ग्रामपंचायत 18 रोजी प्रत्यक्ष मतदान.

मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी ग्रामपंचायतीची मुदत संपली असून 2022__27 या कालावधीसाठी ग्रामपंचायत निवडणूक लागली असून या निवडणुकीचे 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान असून वीस डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल आहे सध्या या ग्रामपंचायतीची अर्ज भरण्याची तारीख 28 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून ही मुदत दोन डिसेंबर पर्यंत आहे या ग्रामपंचायतीला सर्वसाधारण महिला थेट सरपंच पद असून यामध्ये माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या गटाकडून श्री आनंदा शेवाळे अंकुश रजपूत सुरज पाटील यांच्या घरात उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे तर सुरेंद्र गुदगे गटाकडून रणजीत माने व प्रकाश कणसे यांच्या घरात उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रतिष्ठित लोकसंपर्क असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी असा दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहे गेल्या पाच वर्षात सदरची ग्रामपंचायत ही डॉक्टर दिलीपराव जळगावकर व सचिन गुदगे यांच्या ताब्यात होती त्यांनी पाच वर्षात केलेली कामे घेऊन ते जनता दरबारी जाणार आहेत तर यापेक्षाही आम्ही अधिक विकास कसा करू शकतो हे विरोधी पक्ष दाखवणार आहे या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्ते चार्ज झाले असून कसल्याही परिस्थितीत आम्ही ग्रामपंचायत घेणारच असा दावा करीत आहे शेवटी मतदार राजाचा कौल दोन्ही गटाला मान्य करावाच लागणार आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button