वैजापुर:-येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने रक्तदान शिबीर संपन्न.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वैजापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्ताने रक्तदान शिबीर संपन्न.
शिक्षक भारती शिक्षक संघटना वैजापुर व दत्ताजी भाले रक्त पेढी यांच्या वतीने आयोजित रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्ताने येथील पंचायत समितीच्या सहकार महर्षी विनायकराव पटिल सभागृहात रक्तदान शिबीर संपन्न झाले.
गेल्या आठ वर्षापासून सामाजिक भावनेतून हया शिबीराचे आयोजन करण्यात येते समाजाचे आपण देणं लागतो या उदात्त भावनेतून शिक्षक भारती संघटना नेहमीच अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणजे रक्तदान शिबीर होय. गेल्या आठ वर्षापासून सुरु असलेल्या या उपक्रमात रक्तदात्यांचा प्रतिसादही वाढत आहे. “रक्तदान श्रेष्ठदान” आहे. त्याचप्रमाणे रक्त्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात यावेळी ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.वैजापुर तालुका शिक्षक भारती संघटनेच्यावतीने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरास माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर
,तहसीलदार राहुल गायकवाड,कृषी अधिकारी एच.आर.बोयनार,कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे, माजी सभापती संजय पा.निकम,अँड.प्रमोद जगताप यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन कौतुकही केले
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष किशोर कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब हाडोळे, जिल्हा सरचिटणीस मच्छिंद्र भराडे, दत्ताजी भाले रक्त पेढीचे आप्पासाहेब सोमासे,शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब जगताप, तालुका सरचिटणीस अनिल जगदाळे, तालुका कार्याध्यक्ष गणेश रोठे, तालुका कोषाध्यक्ष संतोष सोनवणे,साईनाथ शिंदे,मच्छिंद्र निकम, वसंत ठोंबरे विशाल तांबे, राजू डुकरे, अकोकणेकर, महिला आघाडीच्या सोनाली आवारे खताळ मॅडम , जयश्री मोईन, उषा पवार, वैशाली सुरासे यासह शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.