ब्रेकिंग न्यूज:-गायरान अतिक्रमण नियमित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
हेडिंग
गायरान अतिक्रमण नियमित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
शासनाच्या गायरान जमीनीवर अतिक्रमण करुन घरे बांधलेल्या राज्यातील दोन लाख बावीस हजार जनांना महसूल विभागाने बजावलेल्या नोटिसीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.
गायरान जमीनीवरील घरे नियमित करण्याची कारवाई करा,असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना दिले आहेत.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता, आपण मोफत घरांच्या योजना राबवत आहे.पण गायरान जमिनीवरील लोकांना सरकारने बेघर करु नये.असा विषय मांडला होता.त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने महसूल विभागाने बजावलेल्या नोटिसीला स्थगिती दिली.गायरान जमिनीवरुन ही घरे हटवू नयेत.गावठाण पट्टे तयार करुन ती अधिकृत कशी करता येतील,याची कारवाई करावी,असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना दिले.त्यानुसार करीर यांनी, विभागीय आयुक्तांना गायरान जमीनीवरील अतिक्रमणे अधिकृत करण्याची कारवाई करावी,असे कळविले आहे.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणा बाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे.सरकार तिथेही अतिक्रमण अधिकृत करण्याची भूमिका घेणार आहे.