खटाव:-चोराडे गावांतील अवलिया मा.कुमारजी पिसाळ यांना Global Scholars Foundation यांचा “सातारा भुषण” पुरस्कार.
प्रतिनिधी अभिजीत घुटुगडे खटाव:-9970136639

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
आयुष्यातलं खरं वास्तव मान्य करुन सर्वांगिण आयुष्य जगणारा आपल्या चोराडे गावांतील अवलिया मा.कुमारजी पिसाळ यांना Global Scholars Foundation यांचा “सातारा भुषण” पुरस्कार मिळाला.
मित्रांनो, ऐन तारुण्यांत मा.कुमार पिसाळ यांना रेल्वे अपघातांत आपला पाय गमवांवा लागला. त्यानंतर त्यांना कधीही असे वाटले नाही की आपले अपंगत्व समाजासमोर दाखवावे. आयुष्यांत अडचणी या प्रत्येकालाच येतात परंतु त्याही अडचणींना सामोरे जावं, व त्या परिस्थितीवर मात करत आपले यशाचे शिखर उंच करावे हे मा.कुमार यांच्याकडुन शिकावे. आपल्या कृञीम पायांवरती त्यांनी कळसुबाई शिखर पार केले. सातारा-लेह लडाख हा 6500Km चा प्रवास टु व्हिलर वरती पुर्ण केला. कोणतेही अपंग व्यक्तीने आपण अपंग असल्याचा कमीपणा स्वतःला कधीही वाटू देऊ नये असं ते आवर्जुण सांगत असतांत.
उलट इतरांपेक्षा तुंमच्यामध्ये काहीतरी करण्याची वेगळी धमक आहे ती धमक तुम्ही समाजाला दाखवून देऊन आपण नक्कीच इतरांसाठी एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनावं असं त्यांचं मत आहे.
आज समाजांमध्ये सर्व शरीर यष्टी व्यवस्थित असताना आजचे नवोदित तरुण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वायफट जाताना दिसून येत आहेत तर त्यांच्यासाठी नक्कीच मा.कुमार पिसाळ यांचा आदर्श एक वेगळा संदेश नक्कीच देऊन त्यांच्या डोळ्यावर असलेली, अंधारमय झापड कायमची दूर होउ शकते.
ज्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची कधीही कमी नसते त्या व्यक्तीला कधीच त्या वस्तूची अथवा अवयवाची किंमत कळत नाही अथवा त्याची उणीव कधीच भासत नाही.
परंतु ज्या व्यक्तीकडे जी गोष्ट नसते त्या व्यक्तीला विचारून पहा की त्या अवयवाची काय किंमत असते ते.?.
मा.कुमार पिसाळ यांचा समाजासमोर एक अपंगत्वावर मात केलेला जिद्दीचा संघर्षमय प्रवास मार्गदर्शक ठरतोय.
आजपर्यंत समाजामध्ये कित्येक अपंग व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी कित्येक व्यक्तींसाठी आदर्शमय व प्रेरणादायी बनलेल्या आहेत.
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी नावीन्यपूर्ण गोष्टी दडलेल्या असतात परंतु त्या गोष्टीचा शोध घेणे हे स्वतःच कर्तव्य आहे, त्या गोष्टीचा शोध घेण्यांत मा.कुमार यशस्वी होताना दिसत आहेत.
मा.कुमारजी नक्कीच एक दिवस तुंम्ही यशांच्या सर्वोत्तम शिखरावर पोहोचलेले असाल. आज तुंम्हाला पद्मश्री.पोपटरांव पवार (हिरवे बाजार समिती) यांच्यातर्फे “सातारा भुषण” पुरस्कार देऊन गौरविण्यांत आलेले आहे हे आंम्हा चोराडेवासीयांसाठी आनंदाची व अभिमानास्पद गोष्ट आहे. असेच यशवंत व्हा!!! आपणांस निरोगी आयुष्य लाभो…
धन्यवाद!…
🙏🙏🙏
शब्दांकन :- मा.प्रविण मोकाशी,चोराडे.